बँकांसमोर ग्राहकांच्या रांगा अजूनही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 00:18 IST2020-06-15T00:04:11+5:302020-06-15T00:18:37+5:30

शहरातील विविध खासगी व सार्वजनिक क्षेत्रांतील बँकांसमोर ग्राहकांच्या रांगा कायम असून, अनेक ग्राहकांकडून कोरोनाच्या संकटकाळात कुटुंबाच्या उदरनिर्वासाठी आपल्या खात्यावरील जमापुंजी काढण्याकडे कल दिसून येत आहेत. बँकांमध्ये खात्यातून पैसे काढणाऱ्या, मुदत ठेवी मोडून अथवा त्यावर कर्ज काढणाºया ग्राहकांची गर्दी होत असून, जनधन खात्यावर येणारी पेंशन अणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणारी पेंशन काढण्यासाठी बँकामध्ये येणाºया ग्राहकांचा ओघ अद्यापही सुरू आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वीप्रमाणे बँकेत गर्दी होऊ दिली जात नसल्याने शहरातील विविध बँकांसमोर लांब लांब रांगा दिसून येत आहे.

The queues of customers in front of the banks still linger | बँकांसमोर ग्राहकांच्या रांगा अजूनही कायम

बँकांसमोर ग्राहकांच्या रांगा अजूनही कायम

ठळक मुद्देनागरिकांसमोर आर्थिक अडचणी : खात्यातून पैसे काढण्यावर ग्राहकांचा भर

नाशिक : शहरातील विविध खासगी व सार्वजनिक क्षेत्रांतील बँकांसमोर ग्राहकांच्या रांगा कायम असून, अनेक ग्राहकांकडून कोरोनाच्या संकटकाळात कुटुंबाच्या उदरनिर्वासाठी आपल्या खात्यावरील जमापुंजी काढण्याकडे कल दिसून येत आहेत. बँकांमध्ये खात्यातून पैसे काढणाऱ्या, मुदत ठेवी मोडून अथवा त्यावर कर्ज काढणाºया ग्राहकांची गर्दी होत असून, जनधन खात्यावर येणारी पेंशन अणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणारी पेंशन काढण्यासाठी बँकामध्ये येणाºया ग्राहकांचा ओघ अद्यापही सुरू आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वीप्रमाणे बँकेत गर्दी होऊ दिली जात नसल्याने शहरातील विविध बँकांसमोर लांब लांब रांगा दिसून येत आहे.
नाशिक शहरात लॉकडाऊनमध्ये टप्प्या टप्प्याने शिथिलता मिळत असताना नागरिकांच्या गरजाही वाढल्या असून, वैयक्तिक व कौटुंबिक गरजेच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी आर्थिक अडचणींचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्यांत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकºया गेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अजूनही अनेक नागरिकांना एटीएम अथवा डेबिट कार्डचा वापर करता येत नाही. तसेच मोबाइल अ‍ॅपही वापरता येत नाही, असे ग्राहकही बँकेत पैसे काढण्यासाठी येत असल्याने बँकांसमोर ग्राहकांची गर्दी वाढली आहे.

Web Title: The queues of customers in front of the banks still linger