आदेश बांदेकरांसमोर महिलांनी मांडले प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 19:58 IST2019-08-23T19:56:38+5:302019-08-23T19:58:01+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील सर्वसामान्य जनतेचे तसेच महिलांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आदेश बांदेकर यांच्या ‘माउली संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार शुक्रवारी सकाळी सिडकोतील माउली लॉन्स येथे

आदेश बांदेकरांसमोर महिलांनी मांडले प्रश्न
नाशिक : आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या माउली संवादात महिलांनी शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांच्याकडे सिडको-सातपूर भागातील समस्यांचा पाढा वाचला.
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील सर्वसामान्य जनतेचे तसेच महिलांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आदेश बांदेकर यांच्या ‘माउली संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार शुक्रवारी सकाळी सिडकोतील माउली लॉन्स येथे बांदेकर यांनी महिलांशी थेट संवाद साधून त्यांना भेडसावणारे दैनंदिन प्रश्न, मतदारसंघात विकासकामाची माहिती करून घेतली. यावेळी उपस्थित महिलांनी नाशिम पश्चिम मतदारसंघातील रोजगारी निर्मितीचा गंभीर प्रश्न बनला असून, अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये नवनवीन उद्योग आणणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त केली. याबरोबरच कामगारांना देण्यात येणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी, शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबीयांना मानधन वेळेत मिळावे, कर्जबाजारामुळे आत्महत्या करणा-या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांकडे शासनाने लक्ष द्यावे याबाबतही प्रश्न उपस्थित केले. यावेळी बोलताना आदेश बांदेकर यांनी, रोजगार निर्मिती करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असून, राज्यात सर्वत्र रोजगार मेळावे घेण्यात येत आहे. याबरोबरच सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून जिल्हाधिकाºयांमार्फ त मिळालेल्या वीर जवानांच्या कुटुंबीयांच्या मुलांना केजी टू पीजीपर्यंतचे सर्व शिक्षण मोफत देण्यात येत असल्याचेही बांदेकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, विलास श्ािंदे, डी. जी. सूर्यवंशी, महेश बडवे, सचिन मराठे, प्रवीण तिदमे, दीपक दातीर, रमेश उघडे, सुभाष गायधनी, नाना पाटील, पवन मटाले, सुयश पाटील, बबलू सूर्यवंशी आदी उपस्थित होते.