शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
4
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
5
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
6
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
7
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
8
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
9
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
10
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
11
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
12
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
13
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
14
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
15
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
16
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
17
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
18
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
19
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
20
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या

विमान दुर्घटनेतील पीक पंचनाम्यावर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 1:59 AM

नाशिक : गेल्या आठवड्यात निफाड तालुक्यात कोसळलेल्या विमान दुर्घटनेत नुकसान झालेल्या शेतपिकांचे तलाठी व कृषी सहायकांनी केलेल्या पंचनाम्याविषयी खुद्द प्रशासनातील अधिकाऱ्यांनाच संशय असून, सात शेतकºयांच्या सुमारे पंधरा कोेटी रुपयांच्या नुकसानीचा काढलेला आकडा अवास्तव वाटत असल्याने यासंदर्भात कृषी अधीक्षकांनी स्वत: खात्री करून नव्याने पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

ठळक मुद्देफेरपंचनाम्याच्या सूचनाशासकीय मदत नाहीच

नाशिक : गेल्या आठवड्यात निफाड तालुक्यात कोसळलेल्या विमान दुर्घटनेत नुकसान झालेल्या शेतपिकांचे तलाठी व कृषी सहायकांनी केलेल्या पंचनाम्याविषयी खुद्द प्रशासनातील अधिकाऱ्यांनाच संशय असून, सात शेतकºयांच्या सुमारे पंधरा कोेटी रुपयांच्या नुकसानीचा काढलेला आकडा अवास्तव वाटत असल्याने यासंदर्भात कृषी अधीक्षकांनी स्वत: खात्री करून नव्याने पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.२७ जून रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ओझरच्या एचएएल विमानतळावरून चाचणीसाठी आकाशात उड्डाण घेतलेल्या सुखोई या लढाऊ विमानात तांत्रिक दोष निर्माण झाल्याने ते निफाड तालुक्यातील वावीठुशी शिवारात शेतजमिनीवर कोसळले होते. या विमानातील दोन्ही पायलट सुरक्षितपणे खाली उतरल्याने जीवितहानी टळली असली तरी, या दुर्घटनेत पाच ते सात शेतगटांतील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. साधारणत: या भागात द्राक्षबागाच असल्यामुळे विमान कोसळल्याने बागा जमीनदोस्त झाल्या, तर दूरवर विमानाचे अवशेष विखुरल्याने शेतीपीक नष्ट झाले होते. एका शेतकºयाच्या शेतात मोठा खड्डा झाल्याने नजीकच्या काळात याठिकाणी शेती करणे शक्य नसल्याचे दिसून आले होते.इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतीपिकाच्या झालेल्या नुकसानीवर विश्वास ठेवण्यास शासकीय यंत्रणा तयार नसून, या संदर्भात निफाड उपविभागीय अधिकाºयांनी तालुका कृषी अधिकाºयांना पत्र पाठवून विमान दुर्घटनेच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात कृषी खात्याने संवेदनशीलता दाखविली नसल्याचा ठपका ठेवत या संदर्भात वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत, तर जिल्हा प्रशासनानेही सदरचा अहवाल पुन्हा जिल्हा कृषी अधीक्षकांकडे पाठवून दिला असून, त्यांना फेरपंचानामा करून निश्चित नुकसानीची माहिती सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.शेतकºयांच्या पीक नुकसानीचे पंचनामे करून झालेल्या नुकसानीची भरपाई एचएएलकडून मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असून, त्यानंतरच या शेतकºयांना भरपाई मिळणार आहे. विमान दुर्घटना नैसर्गिक आपत्ती नसल्यामुळे शेतकºयांना शासकीय मदत देय नाही.प्राथमिक अहवाल सादरया दुर्घटनेची दखल घेत निफाडच्या उपविभागीय अधिकाºयांनी तलाठी, मंडल अधिकाºयांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. कृषी सहायकाच्या मदतीने गोरठा व वावी येथील गट नंबर १६७, २८६, २८२, १३४, २४८, २८३, २७६ आदी गटांतील द्राक्षबागांचे पंचनामे करण्यात येऊन त्यात सुमारे पंधरा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करणारा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला आहे.

टॅग्स :Governmentसरकार