स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 07:30 PM2019-10-01T19:30:44+5:302019-10-01T19:32:01+5:30

नांदूरवैद्य : आयुष्यभराच्या जगण्याच्या संघर्षानंतर मरणाचे सोपस्कार तरी सुस्थितीत पार पडावेत ही प्रत्येकाची इच्छा असते. मात्र इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य गावात मरणानंतरही मृतदेहाला यातना सहन कराव्या लागत आहेत. येथे स्वातंत्र्योत्तर काळा अगोदरपासून स्मशानभूमी नसल्याने गावाच्या बाजूला असलेल्या मिलिटरी विभागाच्या हद्दीत उघड्यावरच अंत्यसंस्कार केले जात आहेत.

The question of the cemetery is on the aisle | स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर

नांदूरवैद्य येथे अनेक वर्षांपासून स्मशानभूमी नसल्याने मिलिटरी विभागाच्या हद्दीत असलेल्या जागेत असे उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहे.

Next
ठळक मुद्देनांदूरवैद्य : उघड्यावरच करावे लागतात अंत्यसंस्कार

नांदूरवैद्य : आयुष्यभराच्या जगण्याच्या संघर्षानंतर मरणाचे सोपस्कार तरी सुस्थितीत पार पडावेत ही प्रत्येकाची इच्छा असते. मात्र इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य गावात मरणानंतरही मृतदेहाला यातना सहन कराव्या लागत आहेत. येथे स्वातंत्र्योत्तर काळा अगोदरपासून स्मशानभूमी नसल्याने गावाच्या बाजूला असलेल्या मिलिटरी विभागाच्या हद्दीत उघड्यावरच अंत्यसंस्कार केले जात आहेत.
इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या अन्य गावांत स्मशानभूमी, आधुनिक सुविधा असतांना आमच्या गावाला स्मशानभूमीपासून वंचित का राहावे लागत आहे असा उव्दिग्न सवाल येथील नागरिक प्रशासनाला करीत आहेत.
नांदूरवैद्य येथे नागरिकांचे हेवेदावे, प्रशासनाचे दुर्लक्ष, ग्रामस्थांचा जागेला विरोध, यामुळे जागेअभावी येथील स्मशानभूमीचा प्रश्न अनेक वर्षांपासून लांबणीवर पडला आहे. स्मशानभूमीसाठी जागा देण्यासाठी कोणीही तयार होत नाही. शासनाची गावठाण जागा जरी असली तरी त्याच्या शेजारी असलेल्या खासगी जागामालक त्यास विरोध करत असल्याचे सरपंच उषा रोकडे यांनी माहिती देतांना सांगितले.
नांदूरवैद्य येथे अनेक ग्रामसभांमध्ये स्मशानभूमीच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली असून गावाच्या चारही बाजूला शासनाची गावठाण जागा असून आत्तापर्यंत या गावाला अनेक राजकीय पुढारी लाभले असून परंतु एकाही पुढाऱ्याने स्मशानभूमीबाबत तोडगा काढलेला नाही.
यापेक्षा पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर होत असून अनेकदा पावसातच अंत्यविधी करावे लागतात. त्यावेळी अनेक अडचणी येतात. प्रशासनाने येथील स्मशानभूमीच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देवून जागा निश्चित करावी व त्या ठिकाणी सुसज्ज स्मशानभूमीच्या शेडची पाण्याच्या सुविधेसह लवकर व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी नांदूरवैद्य ग्रामस्थांनी केली आहे.

स्मशानभूमी हा गावाचा मुख्य प्रश्न असून यासाठी गावातील ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतरही जागा उपलब्ध होत नसल्याने जागेअभावी निधी परत गेले असून जागेबद्दल ग्रामस्थांचा विरोध असून आता नव्याने गावठाण हद्दीतील जागा निश्चित करून त्या ठिकाणी पाण्यासह स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावणार आहे.
- उषा रोकडे. सरपंच, नांदूरवैद्य.

गावातील व्यक्ती मरण पावली तर त्याचे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी नाही स्मशानभूमी अत्यंत खेदाची बाब आहे, माञ प्रशासनाने अद्यापही लक्ष दिले नाही. त्यामुळे उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहे.आतातरी प्रशासनाने लक्ष घालून स्मशानभूमीसाठी शासनाच्या गावठाण हद्दीतील जागा उपलब्ध करून स्मशानभूमी उभारण्यासाठी कष्ट घ्यावे.
- गणेश मुसळे. ग्रामस्थ
 

Web Title: The question of the cemetery is on the aisle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.