शुक्ल यजुर्वेदीय संस्थेतर्फे गुणवंतांचा गौरव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 00:43 IST2019-05-21T00:43:39+5:302019-05-21T00:43:58+5:30

शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात विशेष नैपुण्य मिळवणाऱ्या गुणवंतांचा शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या इंदिरानगर विभागातर्फे सत्कार करून गौरविण्यात आले.

 Quality honors by Shukla Yajurvedi Institute | शुक्ल यजुर्वेदीय संस्थेतर्फे गुणवंतांचा गौरव सोहळा

शुक्ल यजुर्वेदीय संस्थेतर्फे गुणवंतांचा गौरव सोहळा

इंदिरानगर : शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात विशेष नैपुण्य मिळवणाऱ्या गुणवंतांचा शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या इंदिरानगर विभागातर्फे सत्कार करून गौरविण्यात आले.
अध्यक्षस्थानी विभाग अध्यक्ष राजश्री शौचे या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अरुण सुलाखे आणि एचएएलचे अतिरिक्त महाप्रबंधक प्रकाश जोशी, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबा पाटील होते. संस्थेचे उपाध्यक्ष माधवराव भणगे, भानुदास शौचे, मालती कुरुंभट्टी, कार्याध्यक्ष तुषार जोशी, कोषाध्यक्ष चंद्रकांत महाजन, राजन कुलकर्णी, प्रा. लक्ष्मीकांत भट, प्रमोद मुळे, दिलीप शुक्ल, सी. व्ही. महाजन, अवधूत कुलकर्णी, रवींद्र भसे, सतीश बालटे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी संस्था अध्यक्ष सतीश शुक्ल, उपाध्यक्ष माधवराव भणगे, तुषार जोशी, कार्यवाह अनिल देशपांडे, कोषाध्यक्ष चंद्रकांत महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी डॉ. दीपाली कुलकर्णी, श्याम बडोदे, रुपाली निकुळे, यशवंत निकुळे, अजिंक्य साने, श्यामला दीक्षित आदी उपस्थित होते.

Web Title:  Quality honors by Shukla Yajurvedi Institute

टॅग्स :Nashikनाशिक