शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या हातात सत्ता द्या, भोंगे बंद करून दाखवू: राज ठाकरे, मनसेचा हिंदुत्वाचा हुंकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 06:02 IST

मुंबई येथील पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात पक्षाची भूमिका जाहीर करू, असे राज ठाकरे म्हणाले. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : सध्याचे राजकारण म्हणजे आळवावरचे पाणी झाले आहे. कोण कोणत्या पक्षात अन् कोण कोणाबरोबर हेच समजत नाही. वरून दाखवायला वेगळे व आतून सर्वजण एकच असल्याचा टोला लगावत माझ्या हातात सत्ता द्या, मी भोंगे बंद करून दाखवतो, असे प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. मुंबई येथील पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात पक्षाची भूमिका जाहीर करू, असेही ते म्हणाले. 

शहरातील दादासाहेब गायकवाड सभागृहात मनसेच्या अठराव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त शनिवारी आयोजित सभेत ठाकरे यांनी २८ मिनिटांच्या भाषणात  सध्याच्या राजकारणावर प्रहार केला. यावेळी  पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, अभिजित पानसरे, अमित ठाकरे, संदीप देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे आदींसह पदाधिकारी उपस्थित हाेते.

माझ्या कडेवरती माझीच पोरं खेळवायची आहेत... 

 माझ्या कडेवरती माझीच पोरं खेळवायची आहेत, इतरांची नाही. दुसऱ्याची पोरं आपल्या कडेवर घेऊन खेळवायची मला हौस नाही, असा टोला त्यांनी सध्या महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर लगावला.

आरक्षणासाठी अडचण

राष्ट्रवादीला मी पक्ष म्हणणार नाही. राष्ट्रवादी निवडून येणाऱ्यांची मोळी आहे. शरद पवार हेच करत आले असे सांगून राज ठाकरे म्हणाले, की जरांगे-पाटील यांना मी तेव्हाच म्हणालो होतो, आरक्षणासाठी तांत्रिक अडचण आहे. सरकारच्या भूलथापांना बळी पडू नका. 

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेNashikनाशिक