पुष्पकनगरला समाजकंटकांचा धुमाकूळं

By Admin | Updated: August 6, 2014 01:57 IST2014-08-06T01:52:09+5:302014-08-06T01:57:55+5:30

पुष्पकनगरला समाजकंटकांचा धुमाकूळं

Pushpaknagar collector's scam | पुष्पकनगरला समाजकंटकांचा धुमाकूळं

पुष्पकनगरला समाजकंटकांचा धुमाकूळं

 

नाशिकरोड : जेलरोड येथील श्री विठ्ठल मंगल कार्यालयामागील पुष्पकनगर येथे समाजकंटकांनी इर्तिगा गाडीसह दुचाकींचे नुकसान करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. इर्तिगा गाडीची काच फोडण्यात आली, तर आठ दुचाकींच्या सीटवर ब्लेड मारण्यात आले. काही दुचाकींच्या पेट्रोलची नळी कापून नुकसान करण्यात आले.
जुना सायखेडारोड येथील श्री विठ्ठल मंगल कार्यालयामागे असलेल्या पुष्पकनगर येथील श्री साईश्रद्धा अपार्टमेंटमध्ये सदर प्रकार घडला. इमारतीच्या वाहनतळामध्ये उभ्या असलेल्या वाहनांना समाजकंटकांनी लक्ष्य केले. सोमवारी रात्री या समाजकंटकांनी अपार्टमेंटच्या वाहनतळात लावलेली इर्तिगा (एमएच १५ डीएस ७७२८) गाडीची पाठीमागील काच फोडून नुकसान केले, तर रहिवाशांच्या आठ मोटारसायकली (एमएच १५ सीएफ ५२५१, एमएच १५ सीबी ४११४, एमएच १५ डीजे ३९६४, एमएच १५ सीआर ७११०, एमएच १५ डीबी ७८१७, एमएच १५ सीएल २६०३, एमएच १५ सीपी ४६५७) या दुचाकींचे सीट ब्लेडने फाडण्यात आले आहे. तसेच पेट्रोल टाकीची नळीदेखील कापून टाकण्यात आल्याने सर्व गाड्यांमधील पेट्रोल वाया गेले.
सकाळी सदर प्रकार नागरिकांच्या लक्षात आला. या घटनेची माहिती नगरसेवक शैलेश ढगे यांना मिळताच त्यांना त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलीस उपआयुक्त डॉ. डी. एस. स्वामी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सावंत यांना सदर घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.
यावेळी पोलिसांनी नागरिकांना धीर देत संयम राखण्याचे आवाहन केले. सदर प्रकार काही टवाळांकडून करण्यात आला असावा, संशय व्यक्त करण्यात आला. पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Pushpaknagar collector's scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.