इगतपुरी स्थानकात पुष्पक एक्सप्रेसचा डबा घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 13:28 IST2019-10-26T13:27:11+5:302019-10-26T13:28:49+5:30

इगतपुरी : येथील रेल्वे स्थानकातून नाशिकच्या दिशेने लखनऊ पुष्पक एक्सप्रेस जात असताना मागून दोन नंबर डब्याचे चाक रु ळावरून घसरले.

The Pushpak Express train fell at Igatpuri station | इगतपुरी स्थानकात पुष्पक एक्सप्रेसचा डबा घसरला

इगतपुरी स्थानकात पुष्पक एक्सप्रेसचा डबा घसरला

इगतपुरी : येथील रेल्वे स्थानकातून नाशिकच्या दिशेने लखनऊ पुष्पक एक्सप्रेस जात असताना मागून दोन नंबर डब्याचे चाक रु ळावरून घसरले. यामुळे कल्याण-नाशिक वाहतुक विस्कळित झाली आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता मुबंई लखनऊ पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी रेल्वे स्थानकावर आली असता गाडी दहा मिनिटे थांबून पुन्हा नाशिककडे रवाना होत असताना प्लॅटफॉर्म क्र मांक दोन वरील वळण असलेल्या ठिकाणी या एक्सप्रेसचे मागून दुसरा डब्याचे चाक रु ळावरु न घसरले. तात्काळ गार्डच्या लक्षात आल्याने त्याने त्वरित माहिती ड्रायव्हरला सांगून गाडी थांबवण्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यामुळे गाडी एक तास थांबण्यिात आली असून ,रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर काम करून गाडी पुर्वरत करण्याचे काम सुरू होते.

Web Title: The Pushpak Express train fell at Igatpuri station

टॅग्स :Nashikनाशिक