दरी येथे प्रस्थापितांना धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:17 IST2019-03-27T00:17:42+5:302019-03-27T00:17:56+5:30
दरी गावात गेल्या अनेक वर्षांपासून पिंगळे घराण्याचे वर्चस्व असलेल्या व उपसरपंचपद ताब्यात ठेवणाऱ्यांना धक्का देत विरोधकांनी बाजी मारली. तर चांदशी येथील धनाजी पाटील यांना प्रतिष्ठा राखण्यास यश मिळाले.

दरी येथे प्रस्थापितांना धक्का
मातोरी : दरी गावात गेल्या अनेक वर्षांपासून पिंगळे घराण्याचे वर्चस्व असलेल्या व उपसरपंचपद ताब्यात ठेवणाऱ्यांना धक्का देत विरोधकांनी बाजी मारली. तर चांदशी येथील धनाजी पाटील यांना प्रतिष्ठा राखण्यास यश मिळाले. त्यांचे पुत्र राहुल पाटील यांनी घवघवीत मते मिळवित संपूर्ण पॅनल निवडून आल्याने सरपंचपदाचा मान साळूबाई विश्राम कचरे यांना मिळाला.
दरी ग्रा.प. निवडणुकीत अॅड. अरुण गुलाबराव दोंदे यांच्या नेतृत्वातील विकास पॅनलला यश प्राप्त झाले. त्यांनी माजी खासदार देवीदास पिंगळे यांचे बंधू राजू पिंगळे व आकाश पिंगळे यांच्या नेतृत्वातील पॅनलला धूळ चारली. तर उपसरपंचपदाचे दावेदार असलेले अपक्ष उमेदवार भारत देवराम पिंगळे यांनी यश संपादन केले. दरीच्या सरपंचपदी अलका अंबादास गांगुर्डे तर सदस्यपदी अरुण गुलाब दोंदे, भाऊराव आचारी, सुनीता बेंडकोळी, सारिका भोई, अर्जुन विजय भोई, अलका आनंद ढेरिंगे, शीतल राजेंद्र ढेरिंगे, मीना सुनील आचारी, भारत देवराम पिंगळे हे निवडून आले.