खरेदी रखडल्याने शेतकऱ्यांच्या हातावर ‘तुरी’
By Admin | Updated: May 6, 2017 01:25 IST2017-05-06T01:25:22+5:302017-05-06T01:25:35+5:30
नाशिक : जिल्ह्यात चार ठिकाणी सुरू असलेली तूर खरेदी २२ एप्रिलनंतर बंद करण्यात आल्याने अद्यापही जिल्ह्यातील ५ ते ६ हजार क्विंटल तूर खरेदी रखडल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

खरेदी रखडल्याने शेतकऱ्यांच्या हातावर ‘तुरी’
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यात चार ठिकाणी सुरू असलेली तूर खरेदी २२ एप्रिलनंतर बंद करण्यात आल्याने अद्यापही जिल्ह्यातील ५ ते ६ हजार क्विंटल तूर खरेदी रखडल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
दरम्यान, खळ्यात काढून ठेवलेली तूर दोन दिवसांपूर्वीच अवकाळी पावसामुळे भिजल्याने शेतकऱ्यांची नुकसान झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. फेब्रुवारीपासून जिल्ह्यात येवला, नांदगाव, मालेगाव व बागलाण या चार तालुक्यांत महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन आणि नाफेडच्या संयुक्त विद्यमाने तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच तूर विक्री केंद्रे उभारण्यात येऊन १२२८ शेतकऱ्यांनी त्यांची ११४२० क्विंटल तूर विक्री केली त्यापोटी जिल्हा मार्केटिंग विभागाकडून या १२२८ शेतकऱ्यांना ५०५० रुपये क्ंिवटल भावाने पाच कोटी ७६ लाख ७१ हजार रुपये अदा करण्यात आल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी परिमल साळुंखे यांनी दिली.
शेतकऱ्यांनी पिकविलेली तूर खरेदी करण्यासाठी नाफेड, एसएफएससी, एफसीआय या केंद्र सरकारअंतर्गत असलेल्या संस्थांमार्फत खरेदीची व्यवस्था आहे. महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ मार्केटिंग फेडरेशन या दोन संस्थांमार्फत खरेदी करण्यात आली.
साधारणत: मार्चअखेरपर्यंतच ही तूर खरेदी केली जाते. यंदा उत्पादन चांगले झालेले असल्याने मार्चनंतर सरकारने तीनवेळा मुदतवाढ देऊन ही खरेदी-विक्री केंदे्र सुरू होती. यावर्षी हमीभाव ५०५० इतका जाहीर झाल्याने शेतकऱ्यांनी सरकारी तूर खरेदी केंद्राकडे गर्दी केली. कारण मुख्य बाजारात तुरीचे भाव ३००० ते ४००० हजारांपर्यंत खाली कोसळले. राज्यात विदर्भात तुरीचे चांगले उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांनी सरकारी तूर खरेदी केंद्राकडेच गर्दी गेली.