महंत भगवतदास महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 00:51 IST2021-07-22T22:52:55+5:302021-07-23T00:51:23+5:30
लोहोणेर : येथील पुरातन बालाजी मंदिरात साकेतवासी श्री. श्री. १००८ महंत भगवतदास महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा साधू महंत यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी भगवतदासजी महाराज यांच्या समाधी स्थळाचे विधिवत पूजन करण्यात आले.

लोहोणेर येथे साकेतवाशी महंत भगवतदास महाराज पुण्यतिथी निमित्ताने उपस्थित साधू, संत व प्रमुख महंत आदी.
लोहोणेर : येथील पुरातन बालाजी मंदिरात साकेतवासी श्री. श्री. १००८ महंत भगवतदास महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा साधू महंत यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी भगवतदासजी महाराज यांच्या समाधी स्थळाचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर दुपारी संत व महंत व ब्राह्मण भोजन पार पडले. यावेळी बागलाण मंडळ अधिकारी तथा बालाजी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष महंत पवनदास महाराज, नाशिक मंडळ अधिकारी व लक्ष्मी नारायण मंदिर ट्रस्ट अध्यक्ष नाशिक महंत रामसनेहीदास महाराज, राम किशोरदास शास्त्री दिगंबर आखाडा नाशिक, रामेश्वर दासजी, बागलाण मंडळ अध्यक्ष तथा पंचमुखी हनुमान मंदिर मालेगाव यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील सर्व स्थानांचे प्रमुख संत, महंत यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी लोहोणेर येथील बालाजी मंदिर सेवेकरी मंडळाचे कार्यकर्ते व युवकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.