मास्क न घातल्याने दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 02:28 IST2020-07-13T20:17:55+5:302020-07-14T02:28:24+5:30
कसबे सुकेणे : शहरात सोमवारी (दि.१३) पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत कोरोना प्रतिबंधक उपाययोजना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि मास्क न वापरणाºया सात नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात आली . या कारवाईत तब्बल सात नागरिकांकडून प्रत्येकी पाचशे रु पये दंड वसूल करण्यात आला ,अशी माहिती कसबे सुकेणे पोलिसांनी दिली.

कसबे सुकेणे येथे कोरोना बाधित रु ग्ण आढळल्याने शहर व परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे एकीकडे ग्रामपालिका आणि प्रशासन कोरोना ला अटकाव करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. आता कसबे सुकेणे ग्रामपालिका आणि पोलिसांनी बेशिस्त नागरिकांवर बडगा उगारला असून पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी शहरात धडक कारवाई सुरु केली. या वेळी मास्क न वापरणाºया सात नागरिकांना प्रत्येकी पाचशे रु पये दंड आकारण्यात आला.
----------------
कोरोना खबरदारी म्हणून कसबे सुकेणे पोलिसांनी शहरात गस्त वाढविली असून बेशिस्त नागरिकांची हयगय केली जाणार नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली. दरम्यान पथकात कसबे सुकेणे पोलीस उपठाण्याचे कर्मचारी पोलीस हवालदार आहेर ,चौरे , अमोल सूर्यवंशी , ग्रामविकास अधिकारी रवी अहिरे, मंगेश जाधव आदींचा समावेश होता.