विनाकारण फिरणाऱ्यांना उठबशाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 23:18 IST2020-04-09T22:03:16+5:302020-04-09T23:18:13+5:30
जिल्हयातील मालेगांव येथे कोरोना विषाणूचा पहीला बळी आणि पाच रु ग्ण बाधित झाल्याचे निदर्शनास येताच मालेगाव पासुन पस्तीस कि.मी. अंतरावर असलेल्या सटाणा शहरात बंदोबस्त कडक करण्यात आला आहे.

सटाण्यात विनाकारण फिरणाऱ्यांना देण्यात आलेली उठबशाची शिक्षा़
सटाण : जिल्हयातील मालेगांव येथे कोरोना विषाणूचा पहीला बळी आणि पाच रु ग्ण बाधित झाल्याचे निदर्शनास येताच मालेगाव पासुन पस्तीस कि.मी. अंतरावर असलेल्या सटाणा शहरात बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. विनाकारण फिरणाºया तरूणांना आणि कुटूंबासोबत मोटरसायकलवर गावाला जाणाºया नागरीकांवर शहरात कडक उपायांबरोबरच काहींना सौम्य शिक्षा देऊन पुन्हा गावात फिरू नये अशी तंबी तर काही नागरिकांना उठबशाची शिक्षा देण्यात आली.