पेट्रोल खरेदी न करण्याचा पंपचालकांचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 23:01 IST2022-05-30T22:59:48+5:302022-05-30T23:01:49+5:30
मनमाड : गेल्या काही दिवसांपासून सर्वच इंधन कंपन्यांनी डिझेलसाठी अघोषित कोटा सिस्टीम लागू केला आहे. यामुळे अधिकृत विक्रेत्यांना मागणीच्या २० टक्केच डिझेल पुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. याचाच परिणाम सोमवारी (दि.३०) मनमाड शहर व परिसरात डिझेल पंपांवर इंधन उपलब्ध नसल्याचे दिसून आले. यामुळे चालकासह नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यातच मंगळवारी (दि.३१) पेट्रोल पंप चालकांनी कंपनीकडून पेट्रोल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सोमवारी सायंकाळी इंधन भरण्यासाठी नागरिकांनी पंपावर मोठी गर्दी केली होती.

इंधन भरण्यासाठी नागरिकांनी केलेली गर्दी.

मनमाड शहरापासून जवळ असलेल्या पानेवाडी शिवारातीळ इंधन कंपन्यांमधून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आदी भागात इंधन पुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही दिवसापासून इंधन पुरवठ्यामध्ये अनियमितता असल्यामुळे याचा सर्वात मोठा फटका पंपचालकाला बसत आहे. तसेच इंधनाची वाहतूक करणाऱ्या चालक-मालकांनाही बसत आहे. रोज सुमारे साडेतीनशे ते चारशे गाड्या भरत असताना गेल्या काही दिवसांपासून एका दिवसाला ७० ते ७५ गाड्या भरल्या जात आहेत. त्यामुळे डिझेलवर चालणाऱ्या गाडी मालकांचे मोठे हाल होताना दिसून येत आहेत. तसेच इंधन पुरवठा कमी होत असल्याने अनेक डिझेल पंप ड्राय दिसू लागले आहेत. आंतराष्ट्रीय बाजारात वाढलेले भाव, कोसळणारे रुपयांचे मूल्य यामुळे इंधनाचे दर वाढत आहेत. कंपन्यांनी तोटा कमी करण्यासाठी इंधन कपातीवर भर दिला आहे.