पुलवामा घटनेचा पाटोद्यात निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 12:26 IST2019-02-16T12:26:13+5:302019-02-16T12:26:49+5:30

पाटोदा :- पाकिस्तान मुर्दाबाद ,पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत व संताप व्यक्त करीत पाटोदा ग्रामस्थांच्यावतीने पाकिस्तानचा पुतळा व टायर जाळून पुलवामा हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला.

Pulwama incident prohibition in Patiala | पुलवामा घटनेचा पाटोद्यात निषेध

पुलवामा घटनेचा पाटोद्यात निषेध

पाटोदा :- पाकिस्तान मुर्दाबाद ,पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत व संताप व्यक्त करीत पाटोदा ग्रामस्थांच्यावतीने पाकिस्तानचा पुतळा व टायर जाळून पुलवामा हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी नागरिकांनी संताप व्यक्त करीत भारताने पाकिस्तानला धडा शिकवावा, आता वाट पाहू नका, त्यांच्या मुसक्या आवळा अशी मागणी केली. ग्रामस्थांच्यावतीने संपूर्ण गावात बंद पाळण्यात आला. व्यापारी बांधवांनी आपले सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेवत निषेध केला. शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .
यावेळी साहेबराव आहेर,कैलास घोरपडे, रतन बोरनारे, एजाज देशमुख , अण्णासाहेब दौंडे यांनी पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध करीत भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी गणपत भवर, सरपंच साहेबराव अहेर, रमेश बोरनारे, भास्कर बोराडे, रघुनाथ नाईकवाडे, कैलास नाईकवाडे, दिलीप बोरनारे, दिलीप बोराडे, तुकाराम पिंपरकर, चंद्रभान नाईकवाडे, बाबासाहेब भुसारे, सुनिल बोराडे, दौलत बोरनारे, प्रदीप गुजराथी, नवनाथ भुसारे, संजय बोरनारे, नामदेव कुदळ, ऋषिकेश जाधव, बापू गायकवाड,निवास बोनाटे,जगदीश बोराडे,गणेश बैरागी अंबादास बोनाटे,भूषण भिसे,,योगेश जाधव,,प्रदीप कुंभारकर ,,सचिन म्हस्के समाधान मिटके,,संदीप राजगुरू,,संपत बोरनारे,,पोलीस पाटील मुजामील चौधरी साहेबराव कुºहाडे, वाळूबा देशमुख, सदशिव शिंदे, चांगदेव आवारे, राजेंद्र छाजेड आदींसह ग्रामस्थ व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Pulwama incident prohibition in Patiala

टॅग्स :Nashikनाशिक