राज्य ग्राहक आयोगाच्या अध्यक्षपदी पुखराज बोरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:17 IST2021-06-09T04:17:45+5:302021-06-09T04:17:45+5:30
मूळ धुळे जिल्ह्यातील रहिवासी असलेले माजी न्यायाधीश बोरा यांनी वर्ष २००० मध्ये नागपूर येथे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश म्हणून काम ...

राज्य ग्राहक आयोगाच्या अध्यक्षपदी पुखराज बोरा
मूळ धुळे जिल्ह्यातील रहिवासी असलेले माजी न्यायाधीश
बोरा
यांनी वर्ष २००० मध्ये नागपूर येथे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश म्हणून काम बघितले होते. ते मुंबई औद्योगिक न्यायालयाचे सदस्यदेखील होते. काही दिवस रत्नागिरी जिल्ह्याचे प्रधान न्यायाधीश म्हणून कामकाज बघितल्यानंतर त्यांची नाशिक जिल्ह्याचे प्रधान न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
त्यानंतर उच्च न्यायालयात प्रबंधक, सर्वोच्च न्यायालयात सहसंचालकपदी नियुक्ती केली. त्यांनी काही दिवस महाराष्ट्र न्यायाधीकरण अकादमीत कामकाज पाहिले. राज्य ग्राहक आयोगाच्या अध्यक्षपदावरून माजी न्यायाधीश ए.पी. भंगाळे निवृत्त झाल्यानंतर सदर पद रिक्त होते. त्यामुळे राज्य ग्राहक आयोगाचे काम थंडावले होते, त्यामुळे आयोगाच्या प्रभारी अध्यक्षांना महत्त्वपूर्ण निर्णय घेताना अडचणींना सामोरे जावे लागायचे.