पाखले यांच्या सारेगम पुस्तकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 00:53 IST2019-11-12T00:53:28+5:302019-11-12T00:53:46+5:30
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द आणि कठोर परिश्रमाने आपल्या व्यवसायात समर्थपणे उभे राहून यशाचे शिखर गाठणे सर्वांनाच शक्य होते, असे नाही. मुंबईसारख्या आर्थिक राजधानीच्या शहरात आपले साम्राज्य निर्माण करणाऱ्या सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्त्वाचा हा जिद्दीचा प्रवास ‘सारेगम’ या पुस्तकातून जगासमोर आल्याने अनेकांना तो कायम प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले.

पाखले यांच्या सारेगम पुस्तकाचे प्रकाशन
सिडको : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द आणि कठोर परिश्रमाने आपल्या व्यवसायात समर्थपणे उभे राहून यशाचे शिखर गाठणे सर्वांनाच शक्य होते, असे नाही. मुंबईसारख्या आर्थिक राजधानीच्या शहरात आपले साम्राज्य निर्माण करणाऱ्या सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्त्वाचा हा जिद्दीचा प्रवास ‘सारेगम’ या पुस्तकातून जगासमोर आल्याने अनेकांना तो कायम प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले.
जळगाव जिल्ह्यातील बहाळ गावातील संजय पाखले यांच्या जीवन प्रवासावर लिहिलेल्या ‘सारेगम’ या पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. पोलीस आयुक्त नांगरे-पाटील व सिनेअभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी किशोर मासूरकर, रमेश मेहता, डॉ. मिलिंद शिरोडकर, डॉ. अभय विसपुते आदी उपस्थित होते. अभिनेत्री कुलकर्णी यांनी दुसºयाच्या सुखासाठी धडपडणाºया एका आगळ्या-वेगळ्या व्यक्तिमत्त्वाच्या यशोगाथेचं हे लोकार्पण प्रेरणादायी ठरेल, असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक अभिनेत्री डॉ. समीरा गुजर यांनी केले. याप्रसंगी सारेगम फेम नचिकेत देसाई, श्रावणी रवींद्र, अवधूत रेगे आणि अर्चना मोरे यांच्या ‘स्वरसंध्या’ या कार्यक्र माने रंगत आणली. यावेळी विनय गोरे, अनिल चितोडकर, नीलेश पूरकर, नितीन दहिवेलकर, सचिन कोठावदे, विकास पाखले, प्रवीण पाखले आणि सतीश पाखले आदी उपस्थित होते.