सबनीशी पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:13 IST2021-02-08T04:13:27+5:302021-02-08T04:13:27+5:30

नाशिक : नाशिकचे प्रकाशक सुभाष सबनीस लिखित सबनीशी या पुस्तकाचे प्रकाशन खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले. या ...

Publication of the book with Sabani | सबनीशी पुस्तकाचे प्रकाशन

सबनीशी पुस्तकाचे प्रकाशन

नाशिक : नाशिकचे प्रकाशक सुभाष सबनीस लिखित सबनीशी या पुस्तकाचे प्रकाशन खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले.

या पुस्तकातील कोणत्याही चार ओळी वाचकांना समाजमनाचा आरसा दाखवणाऱ्या आहेत. अभंग वृत्तातील या रचना मनाचा ठाव घेणाऱ्या आहेत. काही रचना अगदी हलक्या आपल्या रोजच्या जीवनाचे दर्शन घडवणाऱ्या तर काही खोल भावगर्भ समजून घेण्यासाठी पुन्हा वाचायला लावणाऱ्या असल्याचे. खासदार हेमंत गोडसे यांनी काढले. तर नाशिकरोड देवळाली सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्रीराम गायकवाड म्हणाले की, सुभाष सबनीस यांचे सबनीशी हे पॉकेट बुक नाशिकच्या साहित्य विश्वात एक नवीन प्रयोग म्हणून मान्यता पावेल. मनोगत व्यक्त करतांना सुभाष सबनीस म्हणाले, सहा शब्दांच्या तीन आणि चार शब्दांची एक अशा चार ओळीत काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. सोशल मीडियावर या प्रकाराला मित्रांनी आणि वाचकांनी भरभरून दाद दिल्याने हे छोटेखानी पुस्तक वाचकांच्या हाती सोपवीत आहे. या प्रकाशन समारंभप्रसंगी व्यासपीठावर सावानाचे पदाधिकारी प्रा. डॉ. संजय बोऱ्हाडे, लेखक आणि प्रकाशक सुभाष सबनीस व आशुतोष सबनीस उपस्थित होते.

Web Title: Publication of the book with Sabani