मुंगसरेत सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:34 IST2019-03-23T00:34:29+5:302019-03-23T00:34:51+5:30

मुंगसरे गावातील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली असून, प्रश्न पुन्हा एकदा समोर आला असून, नागरिकांच्या मागणीकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

Public toilets in Mungsare | मुंगसरेत सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था

मुंगसरेत सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था

मातोरी : मुंगसरे गावातील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली असून, प्रश्न पुन्हा एकदा समोर आला असून, नागरिकांच्या मागणीकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
मुंगसरे गावातील नागरिकांनी प्रत्येक घरात शौचालयाची बांधणी करून घेतली असली तरी कोळीवाडा व शेजारील नागरीवस्तीत जागेअभावी त्यांना स्वत:चे शौचालय नाही, असे नागरिक स्मशानभूमीशेजारील सार्वजनिक शौचालय वापरत आहे, परंतु हे शौचालय नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरत आहे. टाकी गेल्या वर्षभरापासून भरलेली असून, त्याच्या दुर्गंधीने त्रास होत आहे, तर शौचालयाची टाकी फुटलेल्या अवस्थेत असल्याने रात्री-अपरात्री जाणाऱ्यांच्या जिवावर बेतू शकते तसेच बाहेर कोणत्याही प्रकारची दिवाबत्तीची सोय नाही या समस्यांबाबत तक्रार करूनही ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
टाकीचा स्लॅप फुटला असून, त्यात एक-दोन वेळेस कुत्र्याचे पिल्लं पडून मृत पावले आहेत. हे कोणाच्या जिवावर बेतू नये यासाठी अनेकदा दुरु स्तीची मागणी केली. पण गावातील सरपंच व ग्रामसेवक दुर्लक्ष करत आहेत.
- नंदू म्हैसधुणे, स्थानिक नागरिक

Web Title: Public toilets in Mungsare