शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जनजीवन सुरळीत तर आता वीजेचा खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 16:51 IST

लॉक डाऊन नंतर आता जनजीवन सुरळीत होत असताना दुसरीकडे मात्र आता वारंवार वीज पुरवठ्याने खेळखंडोबा होऊ लागला आहे.

ठळक मुद्देमहावितरणविषयी संताप:

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक- लॉक डाऊन नंतर आता जनजीवन सुरळीत होत असताना दुसरीकडे मात्र आतावारंवार वीज पुरवठ्याने खेळखंडोबा होऊ लागला आहे. गेले दोन महिनेपावसाळापूर्व कामांसाठी शहरात वीज पुरवठा अनियमित होता. मात्र, आतापावसाळा सुरू झाल्यानंतर देखील वारंवार वीज पुरवठा खंडीतहोत असल्यानेनागरीक आणि व्यवसायिक त्रस्त झाले आहेत.

दरवर्षी उन्हाळ्यात वीजेची मागणी वाढते आणि त्यामुळे वीज भारयिमनकरावे लागते. त्यामुळे नागरीकांची ओरड देखील होत असते. यंंदा २३ मार्चपासून लॉक डाऊन असल्याने उद्योग- व्यवसाय बंद होते. साध्या टप-याहीउघड्या नव्हत्या. त्यामुळे सुरवातीला काही काळ वीजेची मागणी घटली होती.नंतर मात्र वीजेचा खेळ सुरू झाला. महावितरणच्या वतीने पावसाळापूर्व कामेआणि झाडांच्या फांद्याची छाटणी करण्यासाठी वीज पुरवठा खंडीत केला जातअसल्याचे सांगितले जात असले तरी यापूर्वी ज्या प्रमाणे ग्राहकांना सूचनादिल्या जात होत्या किंवा एसएमएस पाठवले जात होते, ते बंदच होते. इतकेचनव्हे तर हेल्पलाईनला कॉल केल्याानंतर देखील लॉक डाऊन कर्मचारी कमीअसल्याचे निमित्त केले जात होते. त्यानंतर आता लॉक डाऊनचे निर्बंध शिथीलहोत असून पुन्हा उद्योग आणि बाजारपेठा सुरळीत होत आहेत मात्र आता पुन्हावारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये काम करणेकठीण झाले आहेत. काही ठिकाणी कमी अधिक वीजेच्या दाबाने वीजेच्याउपकरणांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी आहेत.

टॅग्स :Energy Budget 2018ऊर्जा बजेट 2018Nashikनाशिक