शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

एकलहरे वीज प्रकल्प सुरू करण्यासाठी जनहित याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 18:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : येथील टप्पा क्रमांक एकमधील १४० मेगावॉटच्या दोन संचाचे लिलाव करून मोडीत काढू नये, जोपर्यंत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : येथील टप्पा क्रमांक एकमधील १४० मेगावॉटच्या दोन संचाचे लिलाव करून मोडीत काढू नये, जोपर्यंत या दोन संचांच्या बदल्यात प्रस्तावित ६६० मेगावॉटचे काम प्रारंभ होत नाही तोवर टप्पा क्रमांक दोनमधील २१० मेगावॉटचे संच बंद करण्यात येऊ नये यासाठी उच्च न्यायालयात प्रकल्प बचाव संघर्ष समितीच्या वतीने जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

२०११ मध्ये नाशिक औष्णिक वीज केंद्रातील दोन संच कालमर्यादा संपल्याने कायमस्वरूपी बंद करण्यात आले. या दोन संचांच्या बदल्यात ६६० मेगावॉटच्या बदली संचास प्रशासकीय मान्यताही देण्यात आली होती, परंतु त्यास खीळ बसली. हा प्रस्तावित प्रकल्प सुरू करण्यासाठी बचाव संघर्ष समितीने पाठपुरावा केला, परंतु सरकारने ठोस भूमिका घेतली नाही. मात्र ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा प्रकल्प नाशिकलाच होईल, असे जाहीर केले होते. प्रत्यक्षात भुसावळ ६६० मेगावॉटला मंजुरी मिळून कामही सुरू झाले. उमरेड नागपूर येथे ८०० मेगावॉटच्या दोन संचांना परवानगी मिळाली. नंतर हे संच कोराडी येथे ६६० मेगावॉट हलविण्यात आले. परंतु एकलहरे प्रकल्पाबाबत काहीच हालचाल झाली नसल्याचे पाहून अखेर जनहित याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेत म्हटले आहे की, एकलहरे येथील सार्वजनिक उपक्रम बंद न करता त्याचे संवर्धन व वाढीसाठी शासकीय पातळीवर प्रयत्न करण्यात यावेत, मंजूर संचाची उभारणी होत नाही तोवर जुने संच आर अ‍ॅन्ड एम करून कार्यान्वयीत ठेवण्यात यावे, औष्णिक वीज केंद्रासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीवर फक्त औष्णिक प्रकल्प उभारण्यात यावा, सौर प्रकल्प केल्यास लाखो विविध जातींच्या वृक्षांची तोड करावी लागेल, मंजूर प्रकल्पाची उभारणी न केल्यास त्यावर अवलंबून असलेले २५ ते ३० हजार लोक बेरोजगार होतील, असे मुद्दे मांडण्यात आले असून, न्यायालयात ही याचिका दाखल करून घेण्यात आली आहे.चौकट====आधीच्या आघाडी सरकारचे खासगी उद्योगांशी हितसंबंध असल्याने या प्रकल्पास वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या. युती सरकारनेही प्रांतवाद करून विदर्भाचा विकास साधला. त्यामुळेच शेवटी न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला आहे.- शंकरराव धनवटे, अध्यक्ष, प्रकल्प बचाव संघर्ष समिती

टॅग्स :Energy Budget 2018ऊर्जा बजेट 2018Nashikनाशिक