ग्रामीण परिसरात जनता कर्फ्यूस प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 22:39 IST2020-03-22T22:38:17+5:302020-03-22T22:39:12+5:30
वाडीवºहे : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आव्हान केल्याप्रमाणे जनतेने जनता कर्फ्यूस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ग्रामीण भागातदेखील त्याचे प्रतिबिंब उमटत असून, प्रत्येकाने आपले व्यवसाय आणि दुकाने बंद करून लोक घरांमध्ये दिवसभर बसून होते. ग्रामीण भागातील रस्तेदेखील निर्मनुष्य दिसत होते. नेहमी वर्दळीचा असलेला नाशिक-मुंबई महामार्ग- देखील पूर्णत: ठप्प होता. क्वचितप्रसंगी एखादे वाहन वगळता संपूर्ण रस्त्यावर शुकशुकाट होता, शेतकऱ्यांनीदेखील आपली कामे बंद ठेवली होती.

वाडीवºहे येथील निर्मनुष्य रस्ता.
वाडीवºहे : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आव्हान केल्याप्रमाणे जनतेने जनता कर्फ्यूस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
ग्रामीण भागातदेखील त्याचे प्रतिबिंब उमटत असून, प्रत्येकाने आपले व्यवसाय आणि दुकाने बंद करून लोक घरांमध्ये दिवसभर बसून होते. ग्रामीण भागातील रस्तेदेखील निर्मनुष्य दिसत होते. नेहमी वर्दळीचा असलेला नाशिक-मुंबई महामार्ग- देखील पूर्णत: ठप्प होता. क्वचितप्रसंगी एखादे वाहन वगळता संपूर्ण रस्त्यावर शुकशुकाट होता, शेतकऱ्यांनीदेखील आपली कामे बंद ठेवली होती.
संपूर्ण रस्ते, ग्रामीण भागातील सर्व वसाहतींमध्ये शुकशुकाट होता. शनिवारीच गावात फिरून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी जनतेमध्ये जनजागृती केली होती.