शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

गणेशोत्सवासाठी सार्वजनिक मंडळे सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:34 AM

लाडक्या गणरायाच्या आगमनाला पंधरवड्याचा कालावधी शिल्लक असून, लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी गणेशोत्सव मंडळे सज्ज झाली आहेत. पंचवटीतील मंडळांची तयारी सुरू असल्याचे चित्र दिसून येते. सालाबादप्रमाणे छोट्या-मोठ्या मंडळांनी देणगी जमा करण्याबरोबरच मंडप उभारणी कुठे करायची याचे काम सुरू केले आहे.

पंचवटी : लाडक्या गणरायाच्या आगमनाला पंधरवड्याचा कालावधी शिल्लक असून, लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी गणेशोत्सव मंडळे सज्ज झाली आहेत. पंचवटीतील मंडळांची तयारी सुरू असल्याचे चित्र दिसून येते. सालाबादप्रमाणे छोट्या-मोठ्या मंडळांनी देणगी जमा करण्याबरोबरच मंडप उभारणी कुठे करायची याचे काम सुरू केले आहे. विशेष म्हणजे यंदा काही मंडळांनी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरात नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना मदत करण्याचे ठरवत अवाजवी खर्चाला फाटा देण्याचे निश्चित केले आहे.येत्या २ सप्टेंबर रोजी गणरायाची विधिवत स्थापना करण्यात येणार आहे. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी घराघरात गणेशाची प्रतिष्ठापना करणाऱ्या भक्तांनी घरात आकर्षक सजावट करून उत्सवाची पूर्वतयारी आतापासून सुरू केली आहे. परिसरातील दुकानांमध्ये गणरायाच्या विविध छटा असलेल्या मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. बाप्पांसाठी मखर, चौरंग, पाट सजावट वस्तू विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाºया मित्रमंडळांनी मंडप उभारणीसाठी जागा निश्चित करत बाप्पांच्या स्वागताची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी चौकाचौकात गणरायाच्या स्वागत कमान उभ्या करण्याचे ठरविले असल्याने त्यानुसार कमान बनविण्याचे काम सुरू केले आहे. पंचवटीत यंदाच्या वर्षीदेखील धार्मिक, पारंपरिक तसेच समाज प्रबोधनपर देखावे मंडळांकडून साकारले जाणार असून, त्या दृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे.अनेक मंडळांचे कार्यकर्ते परजिल्ह्यात देखावे, विद्युत रोषणाई व सजावटीचे साहित्य आणण्यासाठी रवाना झाले आहेत. काही मंडळांमार्फत नागरिकांसाठी दरवर्षीप्रमाणे सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, त्यादृष्टीने कार्यक्रम पत्रिका वाटप करून तयारी सुरू केली आहे.पंचवटीतील आडगाव, नांदूर, मानूर, मेरी, म्हसरूळ, मखमलाबाद, पेठरोड, सेवाकुंज, नागचौक, राम मंदिर परिसर, जुना आडगाव नाका, नवीन आडगाव नाका, त्रिमूर्तीनगर, हिरावाडी, कृष्णनगर, सरदार चौक, मालवीय चौक, पंचवटी कारंजा, दिंडोरीरोड, रामवाडी, मखमलाबाद नाका, मालेगाव स्टॅण्ड, आरटीओ कॉर्नर आदींसह परिसरातील गणेशोत्सव मंडळांनी देणगी पुस्तके छापून देणगीदारांकडून देणगी जमा करण्याचे काम हाती घेतले आहे.मंडळांमार्फत ज्या त्या कामाची जबाबदारी मंडळांच्या सदस्यांवर देण्यात येऊन कामे वाटून देण्यात आली आहेत त्यानुसार सदस्य आपल्यावर सोपविलेल्या कामाची जबाबदारी पार पाडत आहे.वॉटरप्रूफ मंडपाला पसंतीसध्या पावसाळा सुरू असून, आगामी गणेशोत्सव कालावधीत पावसाच्या सरी बसण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव कालावधीत पाऊस झाला तर देखावे भिजण्याची शक्यता व मंडळाने आयोजित केलेल्या सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमावर पाणी पडण्याची शक्यता असल्याने अनेक मंडळांनी यंदा वॉटरप्रूफ मंडप उभारणीला पसंती दिली आहे. त्यानुसार वॉटरप्रूफ मंडप उभारले जाणार असल्याचे अनेक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :ganpatiगणपतीNashikनाशिक