पोषण अभियान सप्ताह अंतर्गत सटाण्यात जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 15:59 IST2018-09-26T15:58:55+5:302018-09-26T15:59:26+5:30

पोषण अभियान सप्ताह अंतर्गत सटाण्यात जनजागृती
सटाणा : येथील अंगणवाडी केंद्र ,एकात्मिक बालविकास प्रकल्प मालेगाव व बायजाबाई प्राथमिक शाळेच्यावतीने पोषण अभियान सप्ताह कार्यक्र म अंतर्गत विद्यार्थ्यांनी शहरातून जनजागृती रॅलीकाढली.
या रॅलीत उपनगराध्यक्षा संगीता देवरे ,महिला बालविकास सभापती सुरेखा बच्छाव ,पोलीस निरीक्षक वासुदेव देसले ,बालविकास प्रकल्प अधिकारी चंद्रशेखर पगारे , शरद नंदाळे हे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. पोषण अभियान कार्यक्र माबद्दल प्रकल्प अधिकारी पगारे यांनी माहिती दिली.मुख्यसेविका श्रीमती वाघ ,महिरे ,पाटील ,चौधरी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.याप्रसंगी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा रु पाली कोठावदे यांच्यावतीने रेलीत सहभागी विद्यार्थ्यांना टूथपेस्ट ,ब्रशचे वाटप करण्यात आले.अंगणवाडी सेविका सरला वाघ ,अश्विनी थोरात ,सरला जाधव ,उज्वला सोनवणे ,सरिता सोनवणे ,मीनाक्षी जाधव यांनी सकस आहार ,पालेभाज्या ,कडधान्य ,दुध ,अंडी ,फळे यांचे प्रदर्शन मांडले होते.