बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागातर्फे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 17:59 IST2018-08-06T17:59:22+5:302018-08-06T17:59:57+5:30
झोडगे : मालेगाव तालुक्यात कापूस पिकावर होणाऱ्या किड रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कृषी विभाग व रासी सिडस्कडून किडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पांतर्गत शेतकºयांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. त्या अंतर्गत झोडगे येथे ग्रामपंचायत कार्यालयात चित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच बोंडअळी नियंत्रणाचे तज्ज्ञांकडून शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात आले.

बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागातर्फे जनजागृती
झोडगे : मालेगाव तालुक्यात कापूस पिकावर होणाऱ्या किड रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कृषी विभाग व रासी सिडस्कडून किडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पांतर्गत शेतकºयांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. त्या अंतर्गत झोडगे येथे ग्रामपंचायत कार्यालयात चित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच बोंडअळी नियंत्रणाचे तज्ज्ञांकडून शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात आले.
मागील वर्षी कापसाच्या पिकावर बोंडअळीने जोरदार आक्रमण केल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन उत्पन्नात कमालीची घट झाली होती. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते. या खरीप हंगामात कापसाच्या पिकांवर बोंडअळीचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कृषी विभाग व रासी सिडस्कडून कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड असलेल्या ५७ गावामध्ये कृषी सहाय्यक व रासी सिडस् कंपनीचे प्रतिनिधी मनोज जाट यांच्या मदतीने जनजागृती मोहिम चालु आहे.