रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत कळवणला जनजागृती रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 18:58 IST2021-02-09T18:58:24+5:302021-02-09T18:58:47+5:30
कळवण : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, मालेगाव यांच्या वतीने कळवण येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मोटारसायकल रॅलीच्या माध्यमातून रस्ते सुरक्षा - जीवन रक्षा हा संदेश यावेळी देण्यात आला.

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत कळवणला जनजागृती रॅली
कळवण : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, मालेगाव यांच्या वतीने कळवण येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मोटारसायकल रॅलीच्या माध्यमातून रस्ते सुरक्षा - जीवन रक्षा हा संदेश यावेळी देण्यात आला.
३२ व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत यावेळी विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून नुकतीच मालेगाव, सटाणा, देवळा, कळवण या भागातून जनजागृती रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर, विनोद साळवी, मोटार वाहन निरीक्षक सचिन बोधले, किरण लोंढे, पद्माकर पाटील, अतुल सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
यावेळी मोटार वाहन निरीक्षक सचिन बोधले यांनी रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्देश स्पष्ट करून वाहन चालवताना वाहनधारकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. मोटारसायकल रॅली मध्ये डी. आर. खान, वाजीद शेख, योगेश कुलथे, प्रशांत बांबले, जगदीश बाविस्कर, रुद्र धामणे, माजीद शेख, अख्तर पटेल, अथर्व सुतार, महेश तावडे आदी सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कळवण मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक दिनेश सूर्यवंशी, नितीन ठाकरे प्रयत्नशील होते.
(०९ कळवण)
रस्ता सुरक्षा अभियानंतर्गत कळवणला जनजागृती रॅली सहभागी किरण बिडकर, विनोद साळवी, सचिन बोधले, किरण लोंढे, पद्माकर पाटील, अतुल सुर्यवंशी आदी.