‘लेक वाचवा, लेक शिकवा’ लोकनाट्यद्वारे देवगाव येथे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 17:47 IST2019-01-07T17:46:04+5:302019-01-07T17:47:09+5:30
देवगाव : महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार यांचे संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागात ‘लेक वाचवा-लेक शिकवा’ अभियानाच्या प्रचार व प्रसारासाठी शुक्रवारी (दि.४) लोककलाद्वारे देवगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटागंणात जन आंदोलन करण्यात आले.

‘लेक वाचवा, लेक शिकवा’ लोकनाट्यद्वारे देवगाव येथे जनजागृती
देवगाव : महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार यांचे संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागात ‘लेक वाचवा-लेक शिकवा’ अभियानाच्या प्रचार व प्रसारासाठी शुक्रवारी (दि.४) लोककलाद्वारे देवगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटागंणात जन आंदोलन करण्यात आले.
यासाठी रिजनल आउट रीच ब्युरो गीत व नाटक प्रभाग महाराष्ट्र आणि गोवा क्षेत्र पुणे यांच्या मदतीने जनजागृती करण्यात आली. वेळी सदर कलावंतांनी पथनाट्याद्वारे अतिशय छानपणे जनजागृती केली. वेळी ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच विनोद जोशी यांच्या हस्ते कलावंताचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्र माप्रसंगी ग्रामपंचायत देवगावचे सरपंच संजय निलख, उपसरपंच विनोद जोशी, पोलिस पाटील सुनिल बोचरे, तंटामुक्ती अध्यक्ष रंगनाथ उफाडे, सोमनाथ लोहारकर, जगदीश लोहारकर, खंडेराव गव्हाणे, सचिन कुलथे, उमेश कुलथे, मनोज जोशी, गौरव लोहारकर, भैया नरसिंगे, अंबरगीर गोसावी, ग्रामपंचायत कर्मचारी अनिल देशमानकर, राजू पगारे, महेश उफाडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. जि. प. प्राथमिक शाळेचे बाबासाहेब आवारे, कारभारी गांवदे, संदिप बोरसे, तुषार मोहने, राम रोडगे, तानाजी खालकर यासह अंगणवाडी सेविका जयश्री जोशी, कल्पना घाडगे आदी उपस्थित होते. या कार्यक्र माचे सुत्रंसचालन ज्योती अंढागळे यांनी केले. तर जयश्री जोशी यांनी आभार मानले.