जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:26 IST2019-03-24T00:26:04+5:302019-03-24T00:26:27+5:30
जागतिक क्षयरोग सप्ताह व दिनानिमित्त नाशिक महापालिका ट्युबरक्युलॉसिस कंट्रोल सोसायटीच्या वतीने मायको दवाखाना, सातपूर येथून प्रभातफेरी काढण्यात आली.

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती फेरी
नाशिक : जागतिक क्षयरोग सप्ताह व दिनानिमित्त नाशिक महापालिका ट्युबरक्युलॉसिस कंट्रोल सोसायटीच्या वतीने मायको दवाखाना, सातपूर येथून प्रभातफेरी काढण्यात आली. सदर प्रभातफेरीचे उद्घाटन शहर क्षयरोग अधिकारी डॉ. कल्पना कुटे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. रुचिता पावसकर, डॉ. प्राची सोनवणे, डॉ. चंद्रशेखर नामपूरकर, डॉ. भगवान भगत, डॉ. महेंद्र खैरनार, भालचंद्र लव्हारे, नीलेश ढगे, पंकज आहेर तसेच राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचे अधिकारी व कर्मचारी, मायको दवाखाना, गोखले नर्सिंग कॉलेज, आडके नर्सिंग कॉलेज, सह्याद्री नर्सिंग कॉलेज, नवनिर्मिती सामाजिक संस्था, झेप सामाजिक संस्था अनुसया सामाजिक संस्था आदीचे पदाधिकारी उपस्थित होते.