अंनिसतर्फे जनजागृती करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 16:30 IST2018-08-14T16:29:36+5:302018-08-14T16:30:59+5:30
मालेगाव कॅम्प : मालेगाव शहर तालुक्यामध्ये अंधश्रद्धा निर्मुलन समितीची कार्य अधिक जोमाने करण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम घेणार आहे. तसेच नरेंद्र दाभोलकर, पानसरे यांच्या स्मरणार्थ सप्ताह पाळण्यात येणार आहे. यात शालेय विद्यार्थी, सर्व सामान्य नागरिकांसाठी जनजागृती करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन रा.कॉँ.नेते राजेंद्र भोसले, अंनिस मालेगाव शाखेचे समर्थक नचिकेत कोळपकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले.

भोसले यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. कोळपकर म्हणाले शहरातील अंनिस शाखा अधिक मजबुत व कार्यरत करण्यासाठी नवी कार्यकारिणी घोषित केली. यात अंनिस मालेगाव शाखेचे कार्याध्यक्षपदी डॉ. संदीप खैरनार, प्रधान सचिव अंकुश मयाचार्य, उपक्रम प्रमुख नम्रता जगताप, वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प प्रमुख रविंद्र अहिरे व उर्वरित सदस्य यांची नावे घोषित केली. प्रधान सचिव अंकुश मयाचार्य यांनी सप्ताहभर चालणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. १२ ते २० आॅगस्ट दरम्यान शहरातील १५ शाळांमध्ये सर्पविज्ञान अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना सर्प मित्राकडून सापाविषयी माहिती देण्यात येणार आहे. तर अंधश्रद्धा, विज्ञान या विषयावर स्पर्धा आठवी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली आहे. धुळे येथील व्याख्याते दिनेश मोरे यांचे विवेकवाद व सध्याची परिस्थिती यावर व्याख्यान, तरुण-तरुणींना समुदेशन, नशाबंदीसाठी दारु नको दुध घ्या असे विविध सामाजिक जनजागृतीचे कार्यक्रम अंनिस मालेगाव शाखेतर्फे राबवण्यात येणार असल्याचे मयाचार्य यांनी सांगितले.
राजेंद्र भोसले यांनी अंधश्रद्धा व बुवाबाजी या विषयांवर चिंता व्यक्त केली. अंनिसच्या कार्यात जनजागृतीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले. राष्टÑ सेवा दल, हम हिंदुस्थानी संघटना, साने गुरूजी परिवार, साधना कलामंच, नवयुग शेतकरी संघटना, राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाचा पाठींबा असल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेत दिनेश ठाकरे, अंनिस सदस्य अश्वीनी मोरे, प्रशांत पाटील, स्वाती वाणी नम्रता जगताप आदि उपस्थित होते.