शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

पथनाट्याद्वारे रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 6:26 PM

रेझींग डे निमित्त रस्ता सुरक्षा जनजागृती करण्यासाठी शहर पोलिस ठाणे व एसएनडी पॉलीटेक्न्किच्या संयुक्त विद्यमाने बसस्थानकावर विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले.

ठळक मुद्देरेझींग डे : पॉलिटेकनिकच्या विद्यार्थ्यांकडून प्रबोधन

रेझींग डे निमित्त पथनाट्याद्वारे सायबर व रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करतांना एसएनडी पॉलिटेकनिकचे विद्यार्थी.येवला : रेझींग डे निमित्त रस्ता सुरक्षा जनजागृती करण्यासाठी शहर पोलिस ठाणे व एसएनडी पॉलीटेक्न्किच्या संयुक्त विद्यमाने बसस्थानकावर विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. प्रबोधन व जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून येथील बसस्थानकावर सायबर व रस्ता सुरक्षेचे महत्व नागरिकांना पटवून दिले.या पथनाट्यामध्ये संगणक विभागाच्या मुले आणि मुलींनी सहभाग नोंदवला होता. यावेळी त्यांनी प्रामुख्याने सोशल मीडियावर फेक अकाउंटसारख्या साधनांची वापर करून फसवणूक होते. त्यावेळेस पोलीस विभागाची मदत घेऊ शकतो आणि त्यानंतर पदनाट्य मधून एफआयआर अ‍ॅपच्या मदतीने मुली किंवा अडचणीतील व्यक्ती कशी मदत घेऊ शकतो याबाबत जनजागृती करण्यात आली. अनेक रस्त्यावरून प्रवाशी वाहतुक करणारे वाहने धावत असतात. वाहने चालविताना वाहन परवाना, चालकांने वाहन चालवण्याचा परवान यासह सर्व कागदपत्रे परिपूर्ण स्वत: जवळ बाळगा व कटु प्रसंगास सामोरे जाताना त्रास होणार नाही यांची काळजी घ्यावी. मोटरसायकस्वार, बैलगाडी धारक सर्वांनीच नियमाचे पालन केल्यास कारवाईची वेळ येणार नाही. वाहन चालवताना बेशिस्त वर्तन केल्यास कारवाई अटळ राहील असा संदेश देखील या विद्यार्थ्यांनी दिला.बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने अनेकांनी या पथनाट्याला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी पोलीस निरीक्षक नानासाहेब नागदरे, उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी रस्ता सुरक्षा बाबत विविध नियम समजून सांगितले.कार्यक्र माचे संयोजन प्रा. भालेराव, प्रा.पी.एम.लहरे, बी.बी.गव्हाणे, एकनाथ इंगळे यांनी केले.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस