नायगावी स्वाइन फ्लूबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 23:50 IST2018-10-10T23:49:33+5:302018-10-10T23:50:06+5:30

नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने स्वाइन फ्लूबाबत गावात जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

Public awareness about Naigavai Swine Flu | नायगावी स्वाइन फ्लूबाबत जनजागृती

नायगावी स्वाइन फ्लूबाबत जनजागृती

ठळक मुद्देआजाराविषयी असलेले समज-गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने स्वाइन फ्लूबाबत गावात जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
वैद्यकीय अधिकारी योगिता ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी व विद्यालयातील विद्यार्थाी यांनी येथील आरोग्य केंद्रापासून जनजागृती फेरीला सुरवात केली. हनुमान मंदिर, बसस्थानक, बैरागी गल्ली, प्राथमिक शाळा अशा मार्गाने ही फेरी काढण्यात आली. ‘स्वच्छता पाळा स्वाईन फ्लू टाळा’, ‘खोकतांना शिंकताना रूमाल वापरा’,असे जनजागृतीचे फलक घेऊन घरोघरी स्वच्छतेचे महत्त्व राजेंद्र सातपुते, अभिजित देशमुख, भारती देशपांडे आदींनी ग्रामस्थांना पटवून दिले. सध्या सर्वत्र स्वाइन फ्लू व साथीच्या आजारांनी नागरिक हैराण झाले आहेत. स्वाइन फ्लूची शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा जनजागृतीच्या माध्यमातून या आजाराविषयी असलेले समज-गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- योगीता ठाकरे, वैद्यकीय अधिकारी, नायगाव

Web Title: Public awareness about Naigavai Swine Flu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.