पथनाट्यातून डेंग्यूविषयी जनजागृती
By Admin | Updated: December 21, 2014 23:11 IST2014-12-21T23:10:47+5:302014-12-21T23:11:05+5:30
पथनाट्यातून डेंग्यूविषयी जनजागृती

पथनाट्यातून डेंग्यूविषयी जनजागृती
येवला : साईराज शिक्षण प्रतिष्ठान संचलित विश्वलता कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय भाटगावच्या विद्यार्थ्यांनी डेंग्यूच्या ज्वलंत समस्येवर जनजागृतीपर पथनाट्याच्या अभिनव प्रयोगाची सुरुवात ग्रामीण
रुग्णालयात सादरीकरण करून केली.
सध्या शहर व तालुक्यात डेंग्यू, मलेरिया, ताप यांसारख्या आजाराची साथ चालू आहे. या आजाराला कारणीभूत असलेले कारण म्हणजे ठिकठिकाणी नेहमीच दिसणारे पाण्याचे डबके, जुने टायर, रांजण, टाक्या यांमध्ये अळ्यापासून तयार होणाऱ्या डासांपासून हे आजार उद्भवतात. पण आजार झाल्यावर डॉक्टरकडे न जाता बाबा, मांत्रिक यांचा आधार घेतात. त्यामुळे रुग्ण दगावले जातात. या गोष्टीला जबाबदार फक्त आपण आणि आपणच आहोत हे विश्वलता महाविद्यालयाच्या संदीप जठार, प्रियंका उंडे, विशाल बढे, ऋचा वाघचौरे, समाधान चौधरी, रोशन वाहूळ या विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या आधारे अत्यंत मार्मिक पद्धतीने समजावून दिले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भूषण लाघवे, नगरसेवक प्रदीप सोनवणे, वैद्यकीय अधिकारी सदावर्ते, प्राचार्य कदम, पथनाट्याच्या मार्गदर्शक वैशाली पवार उपस्थित होते. (वार्ताहर)