शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हटल्याचा अर्थ असा नाही की..."; अनामलाई यांचे राज ठाकरेंना उत्तर
2
हृदयद्रावक! १०० रुपयांचा टोल वाचवायला शॉर्टकट घेतला अन् जीव गेला; इंजिनिअरसोबत काय घडलं?
3
२५,०००,००० रुपयांची सॅलरी! बर्कशायर हॅथवेच्या CEO च्या कमाईनं वॉरेन बफे यांनाच टाकलं मागे
4
रात्री आई-वडिलांना जेवणातून द्यायची गुंगीचं औषध, मग प्रियकरासोबत... ८ वीतल्या मुलीचं भयंकर कृत्य!
5
इराण पेटला! ५०० आंदोलकांचा बळी, संतापलेले ट्रम्प घेणार मोठा निर्णय; युद्धाची ठिणगी पडणार?
6
डिसेंबरमध्ये 'बजाज-एथर'मध्ये चुरस रंगली! थोडक्यात संधी हुकली..., ओला स्कूटरची विक्री किती झाली? 
7
वर्षाची १३ नाही तर १० च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये...
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
9
US Tariffs Impact: ३० लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार, अनेक कारखाने होतील बंद; ट्रम्प टॅरिफच्या भितीनं कोणी दिला हा इशारा?
10
जमिनीचे पैसे मिळताच बायकोने दिला नवऱ्याला धोका; लाखो रुपये, दागिने घेऊन बॉयफ्रेंडसोबत पसार
11
कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...
12
No Shah...! अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये खामेनेईंविरोधातील रॅलीत घुसला ट्रक, अनेकांना चिरडलं
13
नोकरी बदलताना ईपीएफचं काय होतं, पैसे सुरक्षित राहतात का? काय म्हणतो नियम, जाणून घ्या
14
अंतराळात पेट्रोलपंप...! कधी स्वप्नातही विचार केलाय का? इस्रोचे रॉकेट थोड्याच वेळात झेपावणार...
15
"तुमच्या फील्डमध्ये नंबर १ कोण आहे?", रितेशच्या प्रश्नावर उत्तर देताना राधा पाटीलने गौतमीला डिवचलं, म्हणाली...
16
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
17
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
18
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
19
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
20
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
Daily Top 2Weekly Top 5

लोकअदालत: राज्यात सर्वाधिक दावे नाशकात निकाली; वीस कोटींची वसूली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 21:33 IST

नाशिक : राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी (दि.१०) राष्ट्रीय लोकअदालत नाशिक जिल्ह्यात घेण्यात आली. या अदालतीमध्ये सर्वाधिक ४६ हजार १३९ प्रकरणांचा निपटारा करण्यात आल्याने सलग तिस-यांदा नाशिक राज्यात अव्वलस्थानी राहिले. एकूण वीस कोटी ५२ लाख ४० हजार ८१४ रुपयांची विक्रमी वसुली पूर्व व प्रलंबित प्रकरणांमधून करण्यात आली.जिल्हा व सत्र ...

ठळक मुद्दे७ हजार ९९८ प्रलंबित प्रकरणे; त्यापैकी १ हजार ९८९ निकाली एक लाख ८३ हजार २३ दावा पूर्व प्रकरणे लोकन्यायालयातपूर्व व प्रलंबित प्रकरणांमधून वीस कोटी ५२ लाख ४० हजार ८१४ रुपयांची वसुली

नाशिक : राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी (दि.१०) राष्ट्रीय लोकअदालत नाशिक जिल्ह्यात घेण्यात आली. या अदालतीमध्ये सर्वाधिक ४६ हजार १३९ प्रकरणांचा निपटारा करण्यात आल्याने सलग तिस-यांदा नाशिक राज्यात अव्वलस्थानी राहिले. एकूण वीस कोटी ५२ लाख ४० हजार ८१४ रुपयांची विक्रमी वसुली पूर्व व प्रलंबित प्रकरणांमधून करण्यात आली.

जिल्हा व सत्र न्यायालयात सकाळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन करण्यात आले. या लोकन्यायालयात जिल्हाभरातून प्रलंबित प्रकरणांपैकी ७ हजार ९९८ प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी १ हजार ९८९ प्रकरणे निकाली काढली गेली. तसेच एक लाख ८३ हजार २३ दावा पूर्व प्रकरणे लोकन्यायालयात ठेवण्यात आली होती, त्यापैकी ४४ हजार १५० प्रकरणांचा निपटारा झाला. एकूण ४६ हजार १३९ प्रकरणे निकाली निघाली. दावादालत प्रकरणांमध्ये एकूण रक्कम दहा कोटी ९८ लाख ४८ हजार १६३ रुपये इतकी वसूल झाली. यामध्ये मोटार अपघात प्रकरणांमध्ये सुमारे ३ कोटी ९३ लाख ९१ हजार ३२५ तर धनादेश न वटल्याप्रकरणी ४ कोटी ४२ लाख ५५ हजार २० रुपयांचा दंड व नुकसानभरपाईची रक्कम वसूल करण्यात आली. लोकन्यायालयापुढे आलेल्या ४ हजार ६३७ फौजदारी गुन्ह्यांपैकी ११८ प्रकरणांचा निपटारा होऊन ६ लाख ९५ हजार ५५० रुपयांच्या दंडाची तडजोड रक्कम वसूल करण्यात आली. वाहतुकीसंदर्भात एकूण ८ हजार ४६१ दावे निकाली काढण्यात येऊन १६ लाख ७३ हजार ८०० रुपयांची दंडाची रक्कम वसूल केली गेली. बॅँकेच्या वसुली प्रकरणांशी संबंधित एक हजार २१९ पूर्व दावे दाखल होऊन २४८ दावे निकाली निघाले व १ कोटी ७५लाख ३९ हजार ८०७ रुपयांची तडजोडीची रक्कम वसूल झाली तसेच बॅँक वसुलीच्या ५५ प्रलंबित दाव्यांपैकी १० दावे निकाली निघाले, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुधीरकुमार बुक्के यांनी दिली.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय