आडवाडी शाळेस महिला अध्यक्षांकडून संगणक प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 17:51 IST2019-02-05T17:51:30+5:302019-02-05T17:51:45+5:30
सिन्नर : तालुक्यातील आडवाडी येथील विविध कार्यकारी विकास संस्थेच्या अध्यक्ष मंदाकिनी राजेंद्र बिन्नर यांनी जिल्हा परिषद शाळेस संगणक भेट दिला.

आडवाडी शाळेस महिला अध्यक्षांकडून संगणक प्रदान
सिन्नर : तालुक्यातील आडवाडी येथील विविध कार्यकारी विकास संस्थेच्या अध्यक्ष मंदाकिनी राजेंद्र बिन्नर यांनी जिल्हा परिषद शाळेस संगणक भेट दिला.
इ-लर्निंग शिक्षणाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी संगणक भेट देण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य वनिता शिंदे, सरपंच मुक्ता बिन्नर, फाईन रोपनेट कंपनीचे निखिल बिन्नर, सुदाम सदगीर, तुकाराम बिन्नर, किरण गांजवे, एकनाथ गांजवे, विठ्ठल बिन्नर आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळांत अत्याधुनिक शिक्षण प्रणाली आमंलात आणली जात आहे. दुर्गम भागातही ही सुविधा उपलब्ध केली जात असल्याने आडवाडी गावातील विद्यार्थ्यांना इ-लर्निंग, संगणकीय ज्ञान अवगत व्हावे या उद्देशाने संगणक दिल्याचे अध्यक्ष मंदाकिनी बिन्नर यांनी यावेळी सांगितले. लोकसहभागातून शाळांचा विकास होत असल्याचे जिल्हा परिषद सदस्य वनिता शिंदे यांनी सांगितले. गणपत नवले यांनी प्रास्ताविक केले. सोमनाथ कराड, दीपक उगले यांनी सूत्रसंचालन केले. अजय कुलकर्णी यांनी आभार मानले.