‘ईव्हीएम’च्या विरोधात विरोधी पक्षांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 01:15 IST2019-08-24T01:14:32+5:302019-08-24T01:15:02+5:30

ईव्हीएम विरोधी राष्टय जनआंदोलनाच्या वतीने महाराष्टत काढण्यात आलेल्या ईव्हीएम विरोधी महाराष्टÑ यात्रेचे शुक्रवारी सायंकाळी नाशकात आगमन झाले. यावेळी सर्व विरोधी पक्षांच्या वतीने या यात्रेचे स्वागत करण्यात आले.

 Protests by opposition parties against 'EVM' | ‘ईव्हीएम’च्या विरोधात विरोधी पक्षांची निदर्शने

‘ईव्हीएम’च्या विरोधात विरोधी पक्षांची निदर्शने

नाशिक : ईव्हीएम विरोधी राष्टय जनआंदोलनाच्या वतीने महाराष्टत काढण्यात आलेल्या ईव्हीएम विरोधी महाराष्टÑ यात्रेचे शुक्रवारी सायंकाळी नाशकात आगमन झाले. यावेळी सर्व विरोधी पक्षांच्या वतीने या यात्रेचे स्वागत करण्यात आले.
सायंकाळी पाच वाजता शिवाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ यात्रेचे आगमन होताच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच ईव्हीएम विरोधात मतदारांकडून जागेवरच अर्ज भरून घेण्यात आले. यावेळी यात्रेसोबत आलेले फिरोज मिठावाले, रवि बिर्लाणी, ज्योती बिडकर, धनंजय विदे, युसूफ परमार, जय परांजपे यांनी यात्रेमागचा उद्देश सांगून, ईव्हीएमच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांकडून निवडणुका जिंकल्या जात असल्याचा आरोप केला. यावेळी वत्सला खैरे, राजेंद्र बागुल, सुचेता बच्छाव, संतोष ठाकूर, सुरेश आव्हाड, बबलू खैरे, ज्ञानेश्वर काळे, आशा तडवी, गिरीश मोहिते, अरुण दोंदे, राजू देसले, सुनील मालुसरे, शशी उन्हवणे आदि उपस्थित होते.

Web Title:  Protests by opposition parties against 'EVM'