बंगालमधील घटनेप्रकरणी निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 01:12 IST2021-05-05T22:10:10+5:302021-05-06T01:12:44+5:30
सायखेडा : पश्चिम बंगाल राज्यात भाजप कार्यकर्ते यांच्यावर झालेल्या अमानुष अत्याचाराचा सायखेडा येथे भाजप कार्यकर्ते यांनी जाहीर निषेध केला असून निषेधाचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ तांबे यांना देण्यात आले.

बंगालमधील घटनेचा सायखेडा येथे जाहिर निषेध करित पोलिसांना निवेदन देतांना सारिका डेर्ले, आदेश सानप, जगन कुटे व इतर.
ठळक मुद्देसायखेडा पोलिसांना निवेदन
सायखेडा : पश्चिम बंगाल राज्यात भाजप कार्यकर्ते यांच्यावर झालेल्या अमानुष अत्याचाराचा सायखेडा येथे भाजप कार्यकर्ते यांनी जाहीर निषेध केला असून निषेधाचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ तांबे यांना देण्यात आले.
दोन दिवसांपूर्वी निवडणूका पार पडल्यानंतर लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. तेथील वातावरण खराब करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी जगन कुटे, मनोज भूतडा, आदेश सानप, शाम जोधळे, डॉ. विजय डेर्ले, डॉ. सारिका डेर्ले, सतीश कुटे, अक्षय कातकाडे आदी उपस्थित होते.