दोंडाईचा घटनेचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:16 IST2018-02-21T23:09:00+5:302018-02-22T00:16:57+5:30
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील ज्ञानोपासक शिक्षण मंडळ संचलित नूतन माध्यमिक विद्यालयातील बालवाडीत शिक्षण घेणाºया एका चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना नुकतीच घडली.

दोंडाईचा घटनेचा निषेध
इगतपुरी : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील ज्ञानोपासक शिक्षण मंडळ संचलित नूतन माध्यमिक विद्यालयातील बालवाडीत शिक्षण घेणाºया एका चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेतील अज्ञात आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न येथील संचालक मंडळाने केल्याने याच्या निषेधार्थ भाजयुमोचे माजी प्रदेश सचिव महेश श्रीश्रीमाळ यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी शहरात भाजपाच्या वतीने जोडा मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरातील पटेल चौक येथे माजी मंत्री डॉ. हेमंत भास्कर देशमुख, रवींद्र भास्कर देशमुख, शिक्षक महेंद्र आधार पाटील, प्रतीक शरद महाले, नंदू गुलाब सोनवणे यांच्या प्रतिमेला जोडे मारून व निषेधाच्या घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक दिनेश कोळेकर, उमेश कस्तुरे, अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष रफीक शेख, सुमित बोधक, सुनील वामने, प्रथमेश पुरोहित, सुनील चांदवडकर, कुणाल कदम, विशाल चांदवडकर, किरण दगडे, गौरव गायकवाड, भरत दोडके, कलीम शेख, नितीन मोरे, सुनील वामने, अतुल गवळी, सुरेश कोकणे, हनुमान निसरड, विजय गरुड, राजू वाजे, शंतनू कदम, भूषण चांदवडकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.