पोलीस कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांचा निषेध
By Admin | Updated: September 11, 2016 01:32 IST2016-09-11T01:31:49+5:302016-09-11T01:32:01+5:30
पोलीस कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांचा निषेध

पोलीस कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांचा निषेध
येवला : हल्ले होत राहिल्यास समाजव्यवस्था धोक्यात येण्याची भीतीयेवला : अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनच्या येवला तालुका कार्यकारिणीने एका प्रसिद्धी पत्रकान्वये पोलिस कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध केला आहे.
या निषेध पत्रात म्हटले आहे कि, मुंबई पोलीस दलातील वाहतुक हवालदार शिंदे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात त्यांना जिव गमवावा लागला तर कल्याण मध्ये गणेश विसर्जन प्रसंगी पोलिसावर हल्ला झाला. नाशिक येथे बिट मार्शल विजय मोरे यांच्यावरही हल्ला झाला. हे चिंताजनक आहे.
पोलीस हा समाजाचा सच्चा मित्र व रक्षक असुन, त्यामुळे समाजातील प्रत्येक घटक निवांत आणि निर्भय पणे जीवन जगतो. आपल्या कुटुंबाचा विचार न करता सर्व परिस्थितीवर मात करून रात्रंदिवस कार्यरत असतो. त्यामुळे कोणीही पोलीस कर्मचाऱ्यांवर केलेला हल्ला हा दुर्देवी असतो. असे हल्ले होत राहील्यास समाज व्यवस्था धोक्यात येइल व अराजक सदृश परिस्थिती निर्माण होईल.ज्या ठिकाणी पोलीसांवर हल्ला होत असेल त्या ठिकाणी बघ्याची भुमिका न घेता पोलीसांच्या पाठीशी उभे रहावे. पोलीस कर्मचाऱ्यांवरील हल्ले दुर्दैवी असल्याची प्रतिक्रि या सोसलं मिडियावर उमटु लागल्याने समाजात आपल्या हितचिंतकांची संख्या वाढत असल्याने पोलिसांचे मनोधैर्य अधिक उंचावल्याचे चित्र निर्माण होत असल्याचा सूर पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त होऊ लागली आहे. (वार्ताहर)