मालेगावी वीज कंपनीच्या निषेधार्थ धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 17:09 IST2017-12-13T17:09:28+5:302017-12-13T17:09:38+5:30
मालेगाव : वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा निषेध करीत विविध मागण्यांसाठी शहर राष्टÑवादी काँग्रेस, तालुका मालेगाव पॉवरलूम संघर्ष समिती व लोकसंघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी येथील वीज वितरण कंपनीच्या मोतीभवन कार्यालयाला टाळे ठोकीत धरणे आंदोलन करण्यात आला. मंडळ अभियंता शैलेंद्र राठोड यांना निवेदन सादर करण्यात आले.

मालेगावी वीज कंपनीच्या निषेधार्थ धरणे
मालेगाव : वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा निषेध करीत विविध मागण्यांसाठी शहर राष्टÑवादी काँग्रेस, तालुका मालेगाव पॉवरलूम संघर्ष समिती व लोकसंघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी येथील वीज वितरण कंपनीच्या मोतीभवन कार्यालयाला टाळे ठोकीत धरणे आंदोलन करण्यात आला. मंडळ अभियंता शैलेंद्र राठोड यांना निवेदन सादर करण्यात आले.
मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल, नगरसेवक अतिक कमाल यांनी केले. संतप्त आंदोलकांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकले. कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गेल्या आठवड्यात विजेची तार मुलावर पडून त्याचा निष्पाप बळी गेला आहे. या घटनेला जबाबदार असणाºया अधिकाºयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, नादुरुस्त रोहित्र तातडीने बदलावेत, २४ तास वीज पुरवठा करावा, शहरातील बहुतांशी रोहित्र खराब झाले आहेत. यामुळे पूर्व भागात अंधाराचे साम्राज्य असते. अंधाराचा फायदा घेवून भुरट्या चोºयांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील रोहित्र एजन्सीकडून नादुरूस्त रोहित्राची तपासणी करुन नव्याने बसवावे, यंत्रमाग व्यवसायाला सुरळीत वीजपुरवठा करावा, शहरातील जीर्ण तारा तातडीने बदलाव्यात, सक्तीचे भारनियमन बंद करण्यात यावेत, विजेची तार तुटून बालकाचा मृत्यू झाला आहे या मृत्यूस जबाबदार असणाºया अधिकाºयांवर गुन्हा दाखल करावा आदि मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.