मालेगावी वाढीव वीजबिलांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 02:24 IST2020-07-13T21:30:59+5:302020-07-14T02:24:55+5:30

मालेगाव मध्य : लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांचे वीजबिल माफ करावे, या मागणीसाठी जनता दल (से.)च्या वतीने नवीन बसस्थानकलगतच्या विद्युत वितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ वीजदेयकांची होळी करण्यात आली.

Protest against increased electricity bills in Malegaon | मालेगावी वाढीव वीजबिलांचा निषेध

मालेगावी वाढीव वीजबिलांचा निषेध

मालेगाव मध्य : लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांचे वीजबिल माफ करावे, या मागणीसाठी जनता दल (से.)च्या वतीने नवीन बसस्थानकलगतच्या विद्युत वितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ वीजदेयकांची होळी करण्यात आली.
शहरात तीन महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. राज्य शासनाने यापूर्वीच नाशिक जिल्ह्यासह मालेगाव शहराला अकाली जिल्हा घोषित केले आहे. सध्या परिस्थितीत अल्प प्रमाणात सुधारणा होत असतानाच वीजदरात भरमसाठ वाढ करीत देयके दिली आहे. नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता वीज दरवाढ त्वरित रद्द करून मागील तीन महिन्यांचे बिले माफ करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी सचिव नगरसेवक मुस्तकीम डिग्निटी, नगरसेवक अब्दुल बाकी, मोहंमद सलीम गडबड, मुस्लीम धांडे, युवा जनता दलाचे अध्यक्ष आरीफ हुसैन आदी उपस्थित होते.

Web Title: Protest against increased electricity bills in Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक