आदिवासी कुटुंबास मारहाण घटनेचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 19:15 IST2021-03-23T19:14:28+5:302021-03-23T19:15:24+5:30
पेठ : नांदगाव तालुक्यातील पिप्रळे येथे आदिवासी मजूर दाम्पत्यास झालेल्या मारहाणीचा आखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने निषेध करत दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

पेठ पोलीस ठाण्यात निवेदन देतांना पेठ तालुका आदिवासी विकास परिषदेचे पदाधिकारी.
पेठ : नांदगाव तालुक्यातील पिप्रळे येथे आदिवासी मजूर दाम्पत्यास झालेल्या मारहाणीचा आखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने निषेध करत दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
पेठच्या पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात मजूरी करणाऱ्या आदिवासी दाम्पंत्याला ठेकेदार महिलेने शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेची चौकशी करून दोषींवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी परिषदेचे ओमकार भोये, अनिल सातपुते, किरण पवार, चेतन चौधरी, सनी पेंटार, दिनेश गावंढे, दत्तू पवार, हिरामण खुरकुटे, गौरव चौधरी, मनोज तुंगार आदी उपस्थिती होते.