मालेगावात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 17:06 IST2021-05-29T17:05:45+5:302021-05-29T17:06:19+5:30

मालेगाव : शहरात पेट्रोलने शंभरी पार केल्याच्या निषेधार्थ येथील राष्ट्रवादी युवक काँगेसच्या पदाधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपावर पंपचालक, कर्मचारी आणि ग्राहकांना गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले .

Protest against fuel price hike in Malegaon | मालेगावात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन

मालेगावात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन

ठळक मुद्देलॉकडाऊनने लाखो लोकांचा व्यवसाय, रोजगार बुडाला

मालेगाव : शहरात पेट्रोलने शंभरी पार केल्याच्या निषेधार्थ येथील राष्ट्रवादी युवक काँगेसच्या पदाधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपावर पंपचालक, कर्मचारी आणि ग्राहकांना गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले .

या वेळी महानगर अध्यक्ष दिनेश ठाकरे म्हणाले की, कोरोनाकाळात आधीच सर्वसामान्य घायकुतीला आले आहेत. सर्वसामान्याला प्राणवायू भेटत नाही. औषध उपचार महाग झाला आहे. लॉकडाऊनने लाखो लोकांचा व्यवसाय, रोजगार बुडाला आहे.

याप्रसंगी सागर पाटील, लोकेश चव्हाण, भगवान माळी, चेतन जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनात अनिल सोनवणे, सागर पाटील, लोकेश चव्हाण, राजेंद्र पगार, राजेंद्र जगताप, गणेश लोखंडे, त्र्यंबक पाटील, विजय जगताप, भगवान माळी, सुशील कांबळे, सतीश लोढा आदी सहभागी झाले होते.

Web Title: Protest against fuel price hike in Malegaon