चांदवड येथे इंधन दरवाढीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 00:31 IST2020-07-03T21:57:07+5:302020-07-04T00:31:50+5:30
चांदवड तालुका कॉँग्रेस कमेटीच्या वतीने चांदवडचे तहसीलदार प्रदीप पाटील यांना केंद्र शासनाने केलेली महाराष्ट्र राज्यात भरमसाठ वाढत चाललेली पेट्रोल व डिझेल दरवाढ, कांद्यास हमी भाव व शेतीविषयक प्रश्नांबाबत निवेदन दिले.

चांदवड येथे इंधन दरवाढीचा निषेध
चांदवड : चांदवड तालुका कॉँग्रेस कमेटीच्या वतीने चांदवडचे तहसीलदार प्रदीप पाटील यांना केंद्र शासनाने केलेली महाराष्ट्र राज्यात भरमसाठ वाढत चाललेली पेट्रोल व डिझेल दरवाढ, कांद्यास हमी भाव व शेतीविषयक प्रश्नांबाबत निवेदन दिले. यावेळी सकाळी तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी माजी आमदार शिरिषकुमार वसंतराव कोतवाल, कॉँग्रेसचे तालुका अध्यक्ष, संजय जाधव, कार्याध्यक्ष समाधान जामदार, जिल्हा सरचिटणीस शिवाजी कासव, भिमराव जेजुरे, उत्तमराव ठोंबरे पंकज दखणे, प्रकाश कुरणे, बापु शिंदे आदिसह कार्यकर्त्यांचा समावेश होता.