स्वयंसेवकांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ धरणे
By Admin | Updated: March 2, 2017 01:38 IST2017-03-02T01:38:34+5:302017-03-02T01:38:48+5:30
नाशिक : केरळ येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्त्या,वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ प्रबोधन मंच आणि भाजपाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

स्वयंसेवकांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ धरणे
नाशिक : केरळ येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्त्या आणि कम्युनिस्ट पक्षाच्या वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ प्रबोधन मंच आणि भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. दोषींवर कारवाई करण्याचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
संघ, भाजपा आणि अन्य विरोधी विचारधारेच्या संदर्भात केरळ सरकारने हिंसाचाराचा मार्ग स्वीकारल्याचा संघ परिवाराचा आरोप आहे.
१८ जानेवारी रोजी ५२ वर्षीय स्वयंसेवक संतोष कुमार यांची हत्त्या झाली. तसेच २८ डिसेंबर रोजी पलक्कड येथे माकपा कार्यकर्त्यांनी लावलेल्या आगीत संघाचे कार्यकर्ते राधाकृष्णन आणि पत्नी विमला यांचा मृत्यू झाला. केरळमध्ये माकपा सरकार सत्तेवर आल्यानंतर अशा अनेक संघ कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. तसेच अनेक स्वयंसेवकांचा अन्वनीत छळ सुरू असून सरकार मात्र कोणतीही भूमिका घेत नाहीत, उलट गुंडांना संरक्षण देत आहे. त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले होते.
आंदोलनात आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, पश्चिम प्रांत प्रचार प्रमुख दिलीप क्षीरसागर, जिल्हा
कार्यवाह पंकज वाकदकर, संजय चंद्रात्रे, रमेश गायधनी, रमेश गायधनी, नगरसेवक रंजना भानसी, दिनकर पाटील, श्याम बडोले, रुची कुंभारकर, सुधारक नेवे, प्रदीप निकम, अरुण पवार, विजय मोगल, गोविंदराव चिंचोरे, पेंढारकर यांच्यासह अन्य मान्यवर सहभागी झाले होते. (प्रतिनिधी) .