नाशिकरोड : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा गावामध्ये मुले चोरण्याच्या अफवेमुळे भटकंती व्यवसाय करणाºया भटक्या जमातीतील पाच जणांची निर्घृण हत्या झाल्याने भटकंती करणाºया समाजाला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. आगर टाकळी येथील वैदू समाजातील भटकंती करून पोटाची खळगी भरणाºया पुरुष व महिलांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांना नगरसेवक राहुल दिवे यांच्या नेतृत्वाखाली वैदू समाज बांधवांनी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आगर टाकळी येथील वैदू समाजातील अनेक महिला ग्रामीण भागात खेळणी, कंगवे, सुया, कटलरी आदी साहित्य वस्तू विकण्याचा व्यवसाय करतात. तर गावोगाव फिरून पुरुष छत्र्या, डबे दुरुस्त करण्याचा व्यवसाय करतात. मात्र धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे मुले चोरण्याच्या अफवेमुळे भटक्या समाजातील पाच जणांचा नाहक बळी गेल्याने वैदू समाजामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने खोट्या अफवा पसरवणाºया व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर सनी शिंदे, राजू धनगर, हिरामण शिंदे, सतीश शिंदे, नरेंद्र लोखंडे, दुर्गाबाई लोखंडे, मीराबाई शिंदे, नंदा शिंदे, मारीबाई लोखंडे, अंजू लोखंडे आदी वैदू समाज बांधवांच्या सह्या आहेत.
भटकंती करणाऱ्या समाजाला संरक्षण द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:14 IST