इंदिरानगरला विद्युततारा भूमिगत करण्याचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:33 IST2018-08-12T22:26:40+5:302018-08-13T00:33:03+5:30
इंदिरानगर : परिसरातील नागरिकांनी महावितरण कंपनीस इंदिरानगर व राजीवनगर परिसरातील विद्युततारा भूमिगत करण्याचे दिलेल्या निवेदनाची दखल घेत सुमारे ९९ कोटीचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

इंदिरानगरला विद्युततारा भूमिगत करण्याचा प्रस्ताव
इंदिरानगर : परिसरातील नागरिकांनी महावितरण कंपनीस इंदिरानगर व राजीवनगर परिसरातील विद्युततारा भूमिगत करण्याचे दिलेल्या निवेदनाची दखल घेत सुमारे ९९ कोटीचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
गेल्या एक वर्षापासून शास्त्रीनगर, आदर्श कॉलनी, स्टेट बँक कॉलनी, मोदकेश्वर कॉलनी, अरु णोदय सोसायटी, देवेंद्र सोसायटी, आत्मविश्वास सोसायटी, मानस कॉलनी, महारु द्र कॉलनी, कमोदनगर, राजीवनगर यांसह परिसरात दिवसभरातून पाच ते सहा वेळेस वीजपुरवठा खंडित होत असे. या विजेच्या लपंडावामुळे नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे नादुरु स्त होण्याचे प्रकार वाढले होते. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मंगेश नागरे यांनी पुढाकार घेऊन परिसरातील नागरिकांना बरोबर घेऊन इंदिरानगर व राजीवनगर परिसरांतील विद्युततारा भूमिगत करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविली होती. तसेच त्या संदर्भात निवेदन महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले होते. त्याची दखल घेत कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना परिसरातील विद्युततारा भूमिकेत करण्यासाठी सुमारे ९९ कोटी रु पयांचा प्रस्ताव पाठविला आहे त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच लवकरात लवकर काम सुरू करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.