शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी शासनाकडे ३० कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 16:54 IST

नाशिकच्या ज्या भागात वितरण वाहिन्या टाकण्यात येतात, त्या भागात पाणीपुरवठा सुरळीत होत जाणार आहे. त्याचप्रमाणे महापालिकेने राज्य शासनाकडे ३० कोटी रुपयांच्या कामांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यातील कामे पूर्ण झाल्यानंतर एकूण दीड लाख लोक संख्येला या सुधारणांचा फायदा होईल असा विश्वास आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देनवीन कामांचे महापालिकेकडून नियोेजन यंदा ६० किलोमीटर वितरण वाहिन्यांची कामे सुरूसुमारे दीड लाख नागरीकांना लाभ होणार

नाशिक : शहराला दोन धरणांमधून मुबलक पाणीपुरवठा होत असतानाही अनेक भागांत पाण्याची टंचाई जाणवत असते. ती दूर करण्यासाठी महापालिकेने ४० किलोमीटर वितरण वाहिन्यांची कामे हाती घेतली असून आणखी ६० किलोमीटर वितरण वाहिन्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे अनेक भागांतील पाणीपुरवठा सुरळीत होईल परंतु त्याचबरोबर आणखी नववसाहतीत कामे करण्यासाठी राज्य शासनानाला ३० कोटी रुपयांच्या निधीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर  सुमारे दीड लाख नागरीकांना लाभ होणार आहे.

नाशिक शहराला गंगापूर आणि दारणा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. गंगापूर धरण आणि चेहेडी बंधाऱ्याच्या माध्यमातून ४३० ते ४३५ दशलक्ष लिटर्स पाणी ६५ किलो मीटर लांबीच्या उर्ध्ववाहिनी आणि गुरुत्ववाहिनीद्वारे विविध शुद्धीकरण केंद्रात पाठविले जाते. शहरात शिवाजीनगर, बारा बंगला, पंचवटी, गांधीनगर, नाशिकरोड, निलगिरी बाग या ठिकाणी पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते आणि शहरातील २११ किलोमीटर लांबीच्या शुद्ध पाण्याच्या मुख्य वाहिन्यांद्वारे १०३ जलकुंभ भरण्यात येते. या जलकुंभांतून ग्राहकांपर्यंत पाणीपुरवठा करण्याकरिता १८०० किलोमीटर लांबीच्या वितरण वाहिन्या आहेत. विविध व्हॉल्व्हद्वारे पाण्याचा दाब नियंत्रित करून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र तरीही अनेक भागांत पाणीपुरवठ्याविषयी तक्रारी असतात. यासंदर्भात महापालिकेच्या वतीने वॉटर व एनर्जी आॅडिट करून घेण्यात आले. त्यानंतर आढळलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी हायड्रोलिक मॉडेलिंग करण्यात आले. त्यानुसार कामांचे नियोजन करण्यात आले असून, सध्याच्या त्याच पद्धतीने कामे सुरू आहेत.शहरात चाळीस किलोमीटर लांबीच्या वितरण वाहिन्यांची कामे सुरू असून, आणखी ६० किलोमीटर वितरण वाहिन्यांची कामे येत्या काही दिवसांत सुरू होत आहेत.

नाशिकच्या ज्या भागात वितरण वाहिन्या टाकण्यात येतात, त्या भागात पाणीपुरवठा सुरळीत होत जाणार आहे. त्याचप्रमाणे महापालिकेने राज्य शासनाकडे ३० कोटी रुपयांच्या कामांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यातील कामे पूर्ण झाल्यानंतर एकूण दीड लाख लोक संख्येला या सुधारणांचा फायदा होईल असा विश्वास आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी