२२५ कलावंताचे मानधनासाठी प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:40 IST2021-02-05T05:40:47+5:302021-02-05T05:40:47+5:30
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात समितीचे अध्यक्ष संजय गीते यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. गेल्या दीड ते दोन वर्षापासून ...

२२५ कलावंताचे मानधनासाठी प्रस्ताव
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात समितीचे अध्यक्ष संजय गीते यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. गेल्या दीड ते दोन वर्षापासून जिल्हास्तरीय समिती अस्तित्वात नव्हती. अलिकडेच ही समिती गठीत करण्यात आली आहे. यावेळी समिती सदस्यांनी आपली मते व्यक्त करून आपल्या कलेची माहिती दिली. समाजात जागृती निर्माण करणाऱ्या कलावंताना वेळेवर मानधन मिळत नाही तसेच त्यांना निव्वळ मानधनापुरतेच मर्यादित न ठेवता त्यांच्या कलेचा वापर करून घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. कलावंताना फक्त मानधन न देता त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा तसेच या योजनेची व्याप्ती वाढविण्याची मागणी केली. प्रास्ताविक प्रभारी समाजकल्याण अधिकारी रवींद्र परदेशी यांनी केले. जिल्ह्यातील २२५ कलावंतांचे प्रस्ताव जरी दाखल झाले असले तरी, अजूनही जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात कलावंत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांचा शोध घेऊन त्यांनाही योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू त्याच बरोबर कलावंताना आणखी शासकीय मदत देता येईल याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. अध्यक्ष संजय गीते यांनी, समाजासाठी कलावंत काय करू शकतो हे दाखविण्यासाठी कलावंताचे एक व्यासपीठ या माध्यमातून उभे राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. बैठकीस समितीचे सदस्य सुनील ढगे, शाम लोंढे, हभप निवृत्ती चव्हाण, नंदा पुणेकर, ॲड. शशिकांत पवार, डॉ. सयाजी पगार आदी उपस्थित होते.