सुनेने बळकावली सासऱ्याची मालमत्ता
By Admin | Updated: June 16, 2017 18:25 IST2017-06-16T18:25:03+5:302017-06-16T18:25:03+5:30
गांधीनगर परिसरातील वयोवृद्धाने स्वकष्टाने कमावलेले घर सुनेने बनावट दस्तऐवज करून बळकावल्याचा प्रकार उघडकीस आला

सुनेने बळकावली सासऱ्याची मालमत्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गांधीनगर परिसरातील वयोवृद्धाने स्वकष्टाने कमावलेले घर सुनेने बनावट दस्तऐवज करून बळकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़
दत्तात्रेय शंकर बागुल (७७ रा. हल्ली रामदासस्वामीनगर,टाकळीरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे महामार्गावरील दुर्गानगरमध्ये घर आहे़ या घरात सून क्षितिजा योगेश बागुल (३२) राहते़ दत्तात्रेय बागुल यांनी स्वकष्टाने घेतलेले घर आणि वृद्धापकाळासाठी वॉटर प्युरिफिके शन मशिनरी खरेदी केली होती. सून क्षितिजा हिने घर व मशिनरी बनावट संमतीपत्राच्या आधारे बळकावली असून व्यवसायासाठी शॉप अॅक्ट आणि सेल टॅक्सचे दस्ताऐवज तयार केले़ या दस्तऐवजावर पी. व्ही. भुसे या संशयिताने कागदपत्र बनावट असल्याचे माहिती असूनही साक्षऱ्या केल्याचे बागुल यांनी आपल्या फिर्यादित म्हटले आहे.
याप्रकरणी क्षितिजा बागुल व पी.व्ही.भुसे यांच्याविरुद्ध आडगाव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.