शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

शांतारामबापूंची बंडखोरी अन् मानेंचा प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 00:53 IST

ब हुतेक सन १९९५ ची ती निवडणूक असेल. उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत होते. त्यावेळी रिंगणात मुरलीधर माने, डॉ. दौलतराव आहेर हे मातब्बर उमेदवार होते. त्यांचे कार्यकर्ते ठरलेले, त्यांच्यावर प्रेम करणारा कार्यकत्यांचा गोतावळा मोठा होता.

आठवणीतील निवडणूकब हुतेक सन १९९५ ची ती निवडणूक असेल. उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत होते. त्यावेळी रिंगणात मुरलीधर माने, डॉ. दौलतराव आहेर हे मातब्बर उमेदवार होते. त्यांचे कार्यकर्ते ठरलेले, त्यांच्यावर प्रेम करणारा कार्यकत्यांचा गोतावळा मोठा होता. महत्त्वाचे म्हणजे शांतारामबापू वावरे यांनी कॉँग्रेस पक्षाविरुद्ध बंडखोरी करून आपली उमेदवारी जाहीर केलेली. मुरलीधर माने यांच्याकडे तरुण कार्यकर्त्यांची फौज होती. त्यांना मानणारा मोठा वर्गदेखील होता. प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. लोकांच्या भेटीगाठी व प्रचाराची प्रचार यंत्रणा कशी असावी याबाबत बैठका झडत होत्या. उमेदवाराने कार्यकर्त्यांसह लोकांना, मतदारांना विभागवार भेटायचं ठरलं. त्याप्रमाणे आम्ही भद्रकाली, शिवाजी रोड परिसरात प्रचारफेरी काढण्याचे ठरविले. रिक्षा, लाउडस्पीकरसह मामू हा कार्यकर्ता निशाणी व उमेदवाराचे नाव सांगण्यासाठी सज्ज होता. बॅनर व झेंड्यांनी रिक्षा सजलेली होती. कार्यकर्ते हातात झेंडे घेऊन तयार होते. माझ्या घरासमोर नवापुरा कन्झ्युमर सोसायटीजवळ परिसरातील कार्यकर्ते उमेदवाराचे स्वागत करण्यासाठी उभे होते. त्यात अंबादास बागुल, छबूनाना वाघ, शिर्के, अ‍ॅड. रघुनाथ वाघ हे प्रमुख होते. घरात औक्षणाची तयारी झाली. सर्वजण कॉँग्रेसचे अधिकृत उमेदवार माने यांच्या प्रतीक्षेत होते. मात्र उमेदवार येण्यात थोडा उशीर झाला. याचदरम्यान शांतारामबापू आमच्या भद्रकालीतील उमेदवार असल्याने साहजिकच त्यांच्याकडे राबता अधिक होता. तसेच त्यांच्याबाबत आदरही होता. तितक्यात बापूंची जीप समोर आली. बापू थांबले, त्यांना पाहून आम्ही कार्यकर्ते पसार झालो. बापू घराजवळ आले. घरच्यांना त्यांनी खाली बोलावले आणि हे काय चालले आहे, गल्लीतला उमेदवार असताना ही पोरं काय करत आहेत, कोणाची वाट पाहात आहेत, असे विचारत त्यांनी प्रश्नांचा भडिमार केला. त्यांच्या भावना माझ्या घरच्यांनी ओळखून बापंूचे औक्षण केले. गल्लीतील दोन जणांना गाडीत बसवून तुम्ही ज्येष्ठ आहात. त्या पोराटोरात थांबून काय करणार? त्याचं काम त्यांना करू द्या, असे सांगत बापू तेथून आमच्या दोघा कार्यकर्त्यांना घेऊन निघून गेले. मी मात्र माने साहेबांना घेऊन प्रचार करत होतो.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिकcongressकाँग्रेस